कोपरगाव/वेबटीम: - खोटी माहिती देऊन शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची चौकशी करून वंचित घटकांना या योजनेचा लाभ व्हावा अशी माग...
कोपरगाव/वेबटीम:-
खोटी माहिती देऊन शासनाच्या घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची चौकशी करून वंचित घटकांना या योजनेचा लाभ व्हावा अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रजद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की केंद्र सरकारने विविध नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ व्हावा म्हणून पंतप्रधान आवास योजना,रमाई आवास योजना, शबरी आवास योजना सुरू केली त्या करीता लाभार्थी शासकीय अधिकारी यांना हाताशी धरून व योजनेतील अटी व शर्ती लपवून खोटी माहिती सादर करून या योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरतात मात्र यादी जाहीर झाल्या नंतर स्थानिक ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेऊन लाभार्थी यादी जाहीर केली जाते मात्र अनेक लाभार्थ्यांनी व त्यांच्या कुटुंबियांना या योजनेचा लाभ मिळालेला असताना व एकत्र कुटुंबात शेती,गाडी,नोकरी असताना देखील यादी मंजूर केली जाते या उलट ज्यांना खरोखर घरकुल योजनेची आवश्यकता आहे अशा लोकांना जाणीवपूर्वक कट कारस्थान करून या योजनेतून डावलले जाते सर्व लाभार्थी गावातील असल्याने ग्रामसभेत उगाच वाद होऊ नये म्हणून कोणी विरोध करत नाही त्यास स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांच्या दबावाला बळी पडून ग्रामसेवक देखील कोणताही विरोध करत नाही यामुळे या घरकुल यादीत धनदांडग्या लोकांची नावे समाविष्ट होत असून अनेक गोरगरीब व खरे लाभार्थी वंचित राहत आहे
या योजनेचा लाभ घेणारे अनेक धनदांडगे लोक एका बाजूला या योजनेचा लाभ घेण्यासाठी खोटी माहिती सादर करतात मात्र प्रत्यक्ष घर बांधकाम करताना त्या घराच्या बांधकामासाठी लाखो रुपये खर्च करताना दिसून येतात असे अनेक उदाहरणे आहेत मागील काही दिवसांपूर्वी असा सर्व्हे व्हावा असे आदेश दिले असता त्यास अनेक नागरिकांनी विरोध केला होता, याउलट अनेक खरे लाभार्थी या योजने पासून वंचित राहत असून या लाभार्थी यादीची त्वरित उच्च स्तरीय चौकशी व्हावी त्या साठी अन्य तालुक्यातील अधिकारी नेमून या यादीत नाव समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांच्या शेती,पूर्वीचे घर, नोकरी व आर्थिक क्षमतेचा सर्व्हे करावा व खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक करणारावर व त्यास मदत करणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत असे या पत्रकात पोळ यांनी म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत