राहुरी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक दराडे रस्त्यावर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस निरीक्षक दराडे रस्त्यावर

राहुरी/वेबटीम:- राहुरी शहरात नगर-मनमाड रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी हातगाडी चालकांना सर्व हातगाड्या पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी स्व...

राहुरी/वेबटीम:-



राहुरी शहरात नगर-मनमाड रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणारी हातगाडी चालकांना सर्व हातगाड्या पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी स्वतः रस्त्यावर उतरुन मागे घेण्यास सांगितले.


राहुरी शहरात नगर-मनमाड रस्त्याच्या  रस्त्याच्या दुतर्फा बाजार समिती आवार तसेच मल्हारवाडी रोड परिसरात अनेक छोट्या व्यावसायिकांच्या चहा, वडापाव , भाजीपाला विक्री रसवंतीच्या व अन्य हातगाड्या आहेत. या  हातगाडीवर येणाऱ्या ग्राहकांची वाहने मुख्य रस्त्यावर उभी राहत असल्याने वाहतुकीस नेहमी अडथळा निर्माण होतो.  या सर्व टपऱ्या पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी मागे घेण्यास सांगितल्या. तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन या दृष्टीने सर्वाना सूचना केल्या.



आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी शिर्डी वरून शिंगणापूरकडे जाणार असल्याने दराडे यांनी रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या टपऱ्या व इतर व्यवसायिकांना रस्त्याच्या कडेला न बसता मागे बसण्याच्या सूचना दिल्या. दररोज रस्त्याच्या कडेला दुकाने थाटू नये अशी तंबीच पोलीस निरीक्षक दराडे यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत