राहुरी( वेबटीम):- पतसंस्था व मल्टिस्टेट संस्थाक्षेत्रातील सर्वांना एकसंघ करून त्यांची चांगल्या प्रकारे मोट बांधून खऱ्या अर्थाने सहकार टिक...
राहुरी( वेबटीम):-
पतसंस्था व मल्टिस्टेट संस्थाक्षेत्रातील सर्वांना एकसंघ करून त्यांची चांगल्या प्रकारे मोट बांधून खऱ्या अर्थाने सहकार टिकविण्याबरोबर तो वाढविण्याचे मोठं कार्य सुरेश वाबळे यांच्याकडून होत असून फेडरेशन ऑफ मल्टीस्टेटच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली ही निश्चित त्यांच्या चांगल्या कामाची पावती असल्याचे प्रतिपादन शिर्डी संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले.
श्री.साईबाबा संस्थानच्यावतीने शिर्डी विश्वस्त म्हणून सुरेश वाबळे यांची फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को ऑप. क्रेडिट सोसायटी लि.च्या अध्यक्षदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.प्रसंगी ना.काळे बोलत होते.
पुढे बोलताना ना.काळे म्हणाले की, राज्यभरातील मल्टिस्टेट पतसंस्थांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच मल्टिस्टेट पतसंस्थांचा कारभार अधिक काटेकोर व शिस्तबद्ध होण्यासाठी फेडरेशनच्या माध्यमातून सुरेश वाबळे काम करत आहेत. त्यांच्या नियोजनबद्ध कारभारामुळे फेडरेशनच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. पतसंस्था व मल्टिस्टेट बँक क्षेत्रात वाबळे यांनी आपल्या नेतृत्वगुणांनी क्रांती घडवली असून मल्टिस्टेट चळवळ सातासमुद्रापार पार नेली असून ही नगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे ना.आशुतोष काळे म्हणाले.
यावेळी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे उपाध्यक्ष श्री जगदीशजी सावंत, विश्वस्त श्री एकनाथजी गोंदकर, श्रीमती. अनुराधाताई आदिक, श्री राहुलजी कनाल, श्री अविनाशजी दंडवते, श्री सचिनजी गुजर,श्री जयवंतजी जाधव, श्री महेंद्रजी शेळके, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्रीताई बानायत व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत