अहमदनगर(वेबटीम):- अहमदनगर विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन अंतर्गत असणाऱ्या डॉ विठ्ठलराव विखे पाटील परिचर्या महाविद्यालयाने दि...
अहमदनगर(वेबटीम):-
अहमदनगर विळद घाट येथील डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन अंतर्गत असणाऱ्या डॉ विठ्ठलराव विखे पाटील परिचर्या महाविद्यालयाने दि.28 जानेवारी 2020 रोजी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील परिचर्या महाविद्यालय व महाराष्ट्र परिचर्या परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने “संशोधन आधारित रुग्णसेवा” या विषयाच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे.
या परिषदेला संशोधन आधारित रुग्णसेवा या विषयावर आधारित काम करणारे संशोधक, शास्त्रज्ञ व शैक्षणिक तज्ञ सहभागी होणार आहे. या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी व अहमदनगर दक्षिणेचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते होणार आहे तसेच संस्थेचे सेक्रेटरी लेफ्टनंट जनरल (रिटायर) डॉ.बी. सदानंदा, उपसंचालक प्रा.डॉ. अभिजीत दिवटे यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती संस्थेचे प्राचार्या डॉ.प्रतिभा चांदेकर यांनी दिली.
विद्यापीठातील शैक्षणिक तज्ञ डॉ.ऑगनेस थ्रेडि,उपाध्यक्ष आणि सिस्टीम नर्सिंग ऑफिसर, इंडियाना युनाईटेड स्टेटस ऑफ अमेरिका हे आपल्या मुख्य भाषणातून संशोधन आधारित रूग्णसेवा या परिषदेचे परिचर्या यांना मार्गदर्शन करणार आहे. या परिषदेसाठी देशभरातून उत्सुर्त प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत 600 च्या वर नोंदणी झालेली आहे.
परिचर्या महाविद्यालयाच्या ऑनलाईन पध्दतीने होत असलेल्या परिषदेला डॉ.नॅन्सी डायस, साहयक प्राध्यापक, पूर्व कॅरोलिना विद्यापीठ कॉलेज ऑफ नर्सिंग,सौ.व्ही.जी. जिओर्ज, प्रोग्राम मॅनेजर, डीपार्टमेंट, ऑफ क्लिनिकल एक्सलेंस व डायरेक्टर ऑफ टेक्सास हेअल्थ रीसोर्स मॅग्नेट, टेक्सास, हेअल्थ प्रेसबायटेरियेन हॉस्पिटल प्लानो तसेच ले कर्नल प्राध्यापक डॉ.रेखा रानी गुप्ता, प्राचार्या कॉलेज ऑफ नर्सिंग, पीपल्स युनिव्हर्सिटी, भोपाळ आदी मान्यवर यांचे मार्गदर्शन करणार आहेत.
डॉ विठ्ठलराव विखे पाटील परिचर्या महाविद्यालयात ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदे आयोजनासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील, परिषदेचे मा.अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत