राहुरी(वेबटीम):- राहुरी शहर हद्दीतील सरकारी जमिन गट नंबर २३४ मधून होत असलेल्या अवैध मुरूम उत्खननाबाबत सोमवार दिनांक २४ जानेवारी रोजी छा...
राहुरी(वेबटीम):-
राहुरी शहर हद्दीतील सरकारी जमिन गट नंबर २३४ मधून होत असलेल्या अवैध मुरूम उत्खननाबाबत सोमवार दिनांक २४ जानेवारी रोजी छावा स्वराज्यरक्षक सेना व जय भिम क्रांती सामाजिक सेवा संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे की,राहुरी तालुक्यात तहसीलदार शेख हे रूजू झाल्यापासून राहुरी तालुक्यातील अनेक गावांत अवैध मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणात सुरू असून यापूर्वी कनगर,गणेगाव,चिंचविहिरे, ताहराबाद,वडनेर आदी भागांतून अवैध मुरूम उत्खनन राजरोसपणे सुरू होते.त्याचे लोण आता राहुरी शहर हद्दीत पसरले असून राज्यमंत्री ना.प्राजक्त तनपुरे यांच्या ताब्यात असलेल्या राहुरी नगरपरिषदेच्या सरकारी गट नंबर २३४ मध्ये असलेल्या कचरा डेपो परिसरातून दोन मुरूम तस्करांची गेल्या १ ते २ वर्षांपासून खुलेआम मुरूम तस्करी सुरू असून त्यांच्यावर अद्याप पर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.
संबंधित मुरूम तस्कर यांनी सरकारी जमिनीचे केलेले बेकायदेशीर मुरूम उत्खनन याचा त्वरित पंचनामा करून संबंधितावर त्वरित कारवाई करावी अन्यथा सोमवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी राहुरी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा छावा स्वराज्य रक्षक सेना व जय भिम क्रांती सामाजिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आला आहे.
निवेदनावर छावा स्वराज्यरक्षक सेना राहुरी तालुका अध्यक्ष नेल्सन कदम,जय भिम क्रांती सामाजिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुभाष संसारे आदींच्या सह्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत