महाराष्ट्राच्या चित्ररथाची मतदान प्रक्रिया जनमानसात नेण्याचे संत ज्ञानेश्वर स्कूलचे कार्य कौतुकासद - जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

महाराष्ट्राच्या चित्ररथाची मतदान प्रक्रिया जनमानसात नेण्याचे संत ज्ञानेश्वर स्कूलचे कार्य कौतुकासद - जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र भोसले

कोपरगाव/वेबटीम:- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे विविध राज्यांतील चित्र रथांचे संचालन झाले.यानंतर भारत स...

कोपरगाव/वेबटीम:-



भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त दिल्ली येथे विविध राज्यांतील चित्र रथांचे संचालन झाले.यानंतर भारत सरकारचे वतीने भारतातील विविध राज्यांतील चित्र रथांचे स्पर्धा प्रथमच ऑनलाइन पद्धतीने घेऊन यात जनसामान्य नागरिकांना आपल्या आवडत्या चित्र रथाला मतदान करण्याचा अधिकार प्राप्त करून दिला आहे.

           कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेच्या संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलचे संस्थापक राजेंद्र झावरे,किरण भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्यकारी संचालक विशाल झावरे यांचे संकल्पनेतून सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील चित्र रथ हा राज्यातील जैविक विविधता आणि वन्य जीव - पर्यावरण यांची संपन्नता दर्शविणारा होता.याची माहिती सांगितली.तसेच स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियानाची माहिती सांगून प्रत्येक विद्यार्थाने महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाचा उद्देश जास्त जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक ऑनलाईन प्रक्रियेचे प्रशिक्षण दिले.या माध्यमातून महाराष्ट्राच्या चित्र रथाला सुमारे ३ हजार मतदान करण्याचा टप्पा शाळेच्या माध्यमातून पार करण्यात आला आहे.


 महाराष्ट्राच्या चित्ररथात कास पठार,जैव विविधता मानके,१५ प्राणी,२२ वनस्पती फुले, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू, राज्य पक्षी हरियाल(कबुतर),राज्य फुलपाखरू ब्लू माॅरमाॅन,मोर,वाघ यासह पर्यावरणाने सजलेला आहे.या चित्र रथाला गायक सुदेश भोसले यांचे आवाजात ध्वनीफित आहे.


कोपरगाव येथे जिल्हाधिकारी डॉ राजेन्द्र भोसले, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे,स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विशाल झावरे, शिक्षिका सौ.वसुधाताई झावरे,सौ.प्रियांका शेलार,विद्यार्थी प्रणित गंडे,रुद्र खैरे व रविंद्र पवार यांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीअम स्कूलच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.या उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी पोपटराव काळे,शबाना शेख,गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,प्रशासन अधिकारी मोहनीश तुंभारे,प्रशांत शिंदे यांनीही अभिनंदन केले आहे.


या उपक्रमात सहभागी होवून महाराष्ट्राच्या चित्ररथाची माहिती जनमानसात नेऊन मतदान प्रक्रिया करणार्या विद्यार्थ्यांना रोप देवून गौरविण्यात येणार असल्याची माहिती संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्याध्यापक सचिन मोरे यांनी दिली असून या उपक्रमात सहभागी झालेल्या पालक, विद्यार्थी आणि नागरिक यांचे संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलचे वतीने आभार मानले आहेत.संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूलचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत