कोपरगाव / प्रतिनिधी:- शहरातील येवला नाका येथे दोघांनी आयुर्वेदिक औषध विक्रेत्याला अडवून जबर मारहाण केली. तसेच चारशे रुपये रोख व २५ हजार रुपय...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
शहरातील येवला नाका येथे दोघांनी आयुर्वेदिक औषध विक्रेत्याला अडवून जबर मारहाण केली. तसेच चारशे रुपये रोख व २५ हजार रुपयांची दुचाकी लुटून नेल्याचा प्रकार शनिवारी (ता.२९) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी तत्काळ सूत्रे फिरवून दोघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, इदलुसा रामलू पॅरला हे आयुर्वेदिक औषध विक्रेते येवला नाका परिसरात होते. त्याचवेळी राहुल चव्हाण (रा.करंजी) व तुकाराम भरम भोसले (रा.पढेगाव) या दोघा आरोपींनी त्यांना अडवून त्यांच्याकडून ४०० रुपये रोख व २५ हजार रुपयांची दुचाकी (एमएच.०१, ८१९२) ही बळजबरीने लुटून नेले. या प्रकरणी शहर पोलिसांत इदलुसा पॅरला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील दोघांवर गुरनं.२१/२०२२ भादंवि कलम ३९४, ३४१, ३२३, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, शहर पोलिसांनी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व उपनिरीक्षक ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सूत्रे हलवून वरील दोघा आरोपींच्या मुसक्या आवळत गजाआड केले. पुढीक तपास उपनिरीक्षक भरत दाते हे करीत आहेत. या धडाकेबाज कारवाईबद्दल त्यांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत