राहुरी सायकलिंग व ट्रेकिंग क्लबचे सदस्यांचा अनोखा विक्रम - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी सायकलिंग व ट्रेकिंग क्लबचे सदस्यांचा अनोखा विक्रम

राहुरी(वेबटीम):- ‘पर्यावरण, आरोग्य आणि साहस’ या त्रिसूत्रीचे ब्रीदवाक्य असलेल्या राहुरी सायकलिंग व ट्रेकिंग क्लब तर्फे राहुरी ते एकतेचा पुतळ...

राहुरी(वेबटीम):-



‘पर्यावरण, आरोग्य आणि साहस’ या त्रिसूत्रीचे ब्रीदवाक्य असलेल्या राहुरी सायकलिंग व ट्रेकिंग क्लब तर्फे राहुरी ते एकतेचा पुतळा (Statue of Unity) केवडिया, गुजरात अशा सायकल मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या ४५६ कि. मी. अंतराच्या या मोहिमेत क्लबच्या ११ सदस्यांनी सहभाग नोंदविला. अशी माहिती क्लबचे संस्थापक अध्यक्ष अरुण ताकटे यांनी दिली.


 


राहुरी शहरातील व्यापारी, व्यावसायिक, शासकीय-निमशासकीय क्षेत्रात कार्यरत असणारे व्यक्ती, विद्यार्थी असे व्यायामाची आवड असणारे विविध क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येवून अरुण ताकटे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी सायकलिंग व ट्रेकिंग क्लबची स्थापना केली आहे. या समूहाच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून दर रविवारी तालुका तसेच जिल्ह्यातील विविध धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक पर्यटन व ऐतिहासिक स्थळी सायकलस्वारी केली जाते. युवकांमध्ये पर्यावरण संरक्षण व वैयक्तिक आरोग्याबाबत जाणीव निर्माण होऊन सायकलकडे युवक-युवती आकर्षित व्हावेत, यासाठी क्लबतर्फे विविध सायकल मोहिमांचे आयोजन केले जाते.    


 


भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून तसेच शासनाच्या FIT INDIA मोहिमेस प्रतिसाद देण्याच्या हेतूने क्लबच्या वतीने राहुरी ते केवडीया (एकतेचा पुतळा) गुजरात हे ४५६ कि.मी. हे अंतर सायकलवरुन पार करून एक अनोखा विक्रम केला आहे. या मोहिमेत अध्यक्ष अरुण ताकटे यांच्यासह गोरक्षनाथ मेहेत्रे, कडूबा इंगळे, लेफ्ट. डॉ. सुनिल फुलसावंगे एनसीसी अधिकारी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, रवींद्र मोरे इले. इंजिनिअर (सिमेन्स इंडिया), जयंत जाधव मंडळ कृषी अधिकारी, बाळासाहेब राऊत, नितीन शहाणे, अनिल निकम लेखा परीक्षक, आरिफ इनामदार समादेशक अधिकारी होमगार्ड, सिद्धार्थ लुक्कड या सायकल स्वारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी क्लबचे ज्येष्ठ सदस्य हितेशभाई पटेल व जितुभाई पटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


सदर मोहिमेस शनिवार दि. ८ जानेवारी रोजी पहाटे ०४.३० वा. राहुरी येथून सुरुवात करण्यात आली. राहुरी – नाशिक – सापुतारा – वांसदा – व्यारा – मांडवी – नेत्रंग – राजपिपाला – केवडीया असा ४५६ कि.मी. चा प्रवास करून सायकलस्वार दि. ११ जानेवारी रोजी सकाळी एकतेचा पुतळा (Statue of Unity) केवडीया, गुजरात पोहचले. 


हा क्षण समस्त राहुरीकरासाठी अभिमानाचा व कौतुकाचा असल्याने विविध क्षेत्रांतून त्यांचेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मोहीम यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल क्लबचे सदस्य प्रदीप तनपुरे, ज्ञानेश्वर पोपळघट, विलास तरवडे, प्रीतम बोरा, नगर सेवक सोन्याबापू जगधने, शरद बाचकर, रमेश नालकर, सुनील शिंदे, दीपक मेहेत्रे, रवींद्र जाधव, रवींद्र हरिश्चंद्रे, डॉ. अंगराज पवार, निखील भोसले, गिरीश सुराणा, ओंकार दरक, भारत टेमक, बंटी हरिश्चंद्रे, रिंकू अग्रवाल, सतीश डौले, शुभम हिंगे आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत