राहुरी मतदार संघात तलाव दुरुस्तीसाठी ५ कोटीचा निधी मंजुर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी मतदार संघात तलाव दुरुस्तीसाठी ५ कोटीचा निधी मंजुर

  राहुरी/वेबटीम:- राहुरी मतदारसंघातील कात्रड,पाथर्डी तालुक्यातील शिराळ,मोहोज बु ,मोहोज खु,मांडवे,तिसगांव, कोल्हार, त्रिभुवनवाडी,सोमठाणे, निर...

 राहुरी/वेबटीम:-


राहुरी मतदारसंघातील कात्रड,पाथर्डी तालुक्यातील शिराळ,मोहोज बु ,मोहोज खु,मांडवे,तिसगांव, कोल्हार, त्रिभुवनवाडी,सोमठाणे, निरी,बैजुबाभुळगांव, भोसे,तसेच नगर तालुक्यातील शेंडी व पांगर येथील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाने रु.४ कोटी ७३ लाख ४६ हजार रुपयांचा निधी मंजुर केला असल्याची. माहीती राज्याचे नगरविकास उर्जा राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.


ना. तनपुरे पुढे म्हणाले की, मतदार संघातील राहुरी मतदार संघातील शेतक-यांसाठी महत्वपुर्ण वरदान ठरणा-या पाझर तलाव दुरुस्तीसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आली आहे. कात्रड (१३ लाख १ हजार) ,पाथर्डी तालुक्यातील मोहज गट ८४ (५ लाख ६१ हजार) मांडवे क्र.१ (७ लाख ५९ हजार ) ,मांडवे क्र.२ (१७ लाख ७८ हजार),  कडगाव येथील तलावासाठी 44 लाख 34 हजार ,तिसगांव (९ लाख ८८ हजार ),कोल्हार-१ जानदरा (१० लाख ७९ हजार), कोल्हार- २ (९ लाख ७२ हजार ) मोहोज बु. (८ लाख ५७ हजार ),त्रिभुवनवाडी क्र.१ (८ लाख ४३ हजार) ,त्रिभुवनवाडी क्र.२ (३ लाख ५८ हजार ), सोमठाणे पुलाजावळ (९ लाख ९३ हजार),सोमठाणे – शेराचा मळा (९ लाख १८ हजार) ,सोमठाणे – शिदोरे मळा (१० लाख ३७ हजार ),शिराळ -गव्हाणे वस्ती (१२ लाख ८५ हजार) ,शिराळ- वाघ वस्ती (१२ लाख २४ हजार) , शिराळ -गट नं.३७३(१४ लाख) ,मिरी क्र.२ (६२ लाख ४२ हजार), मिरी क्र.१ (४५ लाख २६ हजार), भोसे (१६ लाख १८ हजार),बैजुबाभुळगांव (४५ लाख ८७ हजार),कोल्हार गट नं.८४२ (३ लाख २ हजार) , तसेच नगर तालुक्यातील शेंडी – कराळे मळा (४६ लाख २ हजार ) ,शेंडी कराळेमळा -२ (४९ लाख ६ हजार), पांगरमल (४० लाख ३७ हजार ) येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी एकुण ४ कोटी ७३ लाख ४६ हजार चा निधी मंजुर झालेला आहे.

राहुरी नगर पाथर्डी तालुक्यातील तलावांचे दुरुस्तीचे कामे ब-याच वर्षापासुन झालेले नव्हते. या तलावांची अवस्था अतिवृष्टी मुळे झालेल्या पावसाने अतिशय बिकट झाल्याने पाणी गळतीचे प्रमाणही अधिक होते. पावसाळ्यातील पाणी साचुन गळतीमुळे तलाव लवकर कोरडे पडत होते.मंत्री तनपुरे यांचेकडे येथील लाभधारक शेतक-यांनी तलाव दुरुस्तीची मागणी केलेली होती.या मागणीची त्यांनी गंभीरतने दखल घेवुन शासन पातळीवर वेळोवेळी पाठपुरावा करुन जलसंधारण विभागाने या तलाव दुरुस्तीसाठी निधी मंजुर केल्याने या परीसारातील शेतक-यांचे क्षेत्र ओलीताखाली येण्यास मदत होणार आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.


तसेच राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील उर्वरीत पाझर तलावांची दुरुस्ती निधी मंजुर करणेसाठी पाठपुरावा चालु असुन लवकरच या कामांना मंजुरी मिळण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. याकामामुळे राहुरी तालुक्यातील व नगर तालुक्यातील लाभधारक शेतक-यांनी मंत्री तनपुरे यांचे आभार मानुन समाधान व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत