देवळाली प्रवरा(वेबटीम):- राहुरी तालुक्याचे माजी आमदार तथा शिर्डी संस्थांनचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली प्र...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
राहुरी तालुक्याचे माजी आमदार तथा शिर्डी संस्थांनचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त देवळाली प्रवरा प्रीमियम लीग-२०२२ टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा लीग पद्धतीने खेळविण्यात येणार असून एकूण ८ संघ यात सहभाग नोंदविण्याची संधी असून त्यास प्रत्येकी संघास एक आयोजक असणार आहे.
या स्पर्धेत देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतीलच खेळाडूंना सहभाग नोंदविता येणार असून इच्छूक खेळाडूंनी रविवार ३० जानेवारी रोजी सकाळी १२ वाजेपर्यंत संपर्क साधावा व येताना सोबत आधार कार्ड झेरॉक्स सोबत आणावे याच दिवशी सायंकाळी ४ वाजता संघातील खेळाडूंची निवड होणार आहे. तरी अधिक माहितीसाठी देवळाली प्रवरा येथील सत्यजीत कदम फाउंडेशन कार्यालय येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत