कोपरगांव शहर विकासात भाजपाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांचे मोठे योगदान - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगांव शहर विकासात भाजपाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांचे मोठे योगदान

  कोपरगाव/वेबटीम:- कोपरगांव शहर विकासात भाजपाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांचे मोठे योगदान असुन त्यांनी तत्कालीन शासनाकडुन आणलेल्या निधीतून का...

 कोपरगाव/वेबटीम:-




कोपरगांव शहर विकासात भाजपाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांचे मोठे योगदान असुन त्यांनी तत्कालीन शासनाकडुन आणलेल्या निधीतून कामे होत आहेत., २८ कामांबाबत विरोधिक आमचेवर सतत टिका टिप्पणी करतात, पण त्यातील ६ कामांचे सत्य जनतेसमोर मांडत नव्हते, या सर्व २८ कामांची गुणवत्ता आणि दर्जा चांगलाच असला पाहिजे अन्यथा त्याची एका दिवसात धुळधाण व्हायला नको असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. 




           शहरातील प्रभाग क्रमांक पाच मधील सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून सुमारे ९ लाख ९९ हजार रुपये खर्चाचे जवाहर मेडिकल व भारत प्रेस रस्ता काँक्रिटीकरण करणे, संत ज्ञानेश्वर माऊली चव्हाण घर ते गोकुळ शेठ गंगवाल रस्ता दलितेतर योजनेतून ९ लाख ९९ हजार रुपये खर्चाचे रस्ता काँक्रिटीकरण करणे, नगरपालिका फडातून ९ लाख ९६ हजार रुपये खर्चाचे अजित कुलकर्णी घर ते विनोद डागा घरापर्यंतचा रस्ता काँक्रिटीकरण करणे तसेच नगरपालिका फंडातून महावीर भगवान मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक ९ लाख ९७ हजार रुपये खर्चाचे विकास कामांची उद्घाटने स्व. बाळासाहेब ठाकरे व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधत रविवारी विवेक कोल्हे यांच्या हस्ते. करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा सेनेचे कैलास जाधव, माजी नगराध्यक्षा ऐश्वर्या सातभाई होत्या. 



           प्रारंभी माजी उपनराध्यक्ष योगेश बागुल प्रास्तविक करतांना म्हणाले की, शहर विकास कामांना भाजपा सेना नगरसेवकांचा कधीही विरोध नव्हता तसे सर्व ठराव आमच्याच सर्व सभापतींच्या हस्ते झालेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तम प्रशासक आहेत, त्यांच्याकडेही आम्ही उर्वरीत शहर विकासाचे प्रस्ताव सादर केले असून ते देखील मार्गी लागाले आहेत. 

            माजी नगराध्यक्ष संजय सातभाई म्हणाले की, कोपरगांवचे वाढते शहरीकरण लक्षात घेऊन निळवंडे शिर्डी कोपरगांव बंदिस्त पिण्यांच्या पाण्याची योजना मंजुर करून आणण्यांत सौ. स्नेहलता कोल्हे यांचा मोलाचा वाटा आहे, पण त्याबाबत सातत्याने दिशाभूल करून या योजनेला खो देण्याचे पाप काही मंडळी करत आहेत, त्यांनी शहराच्या युवापिढीच्या भावना लक्षात घेऊन या कामाला हिरवा कंदिल दाखवावा, यामुळे शिर्डीसह कोपरगांवचे अर्थकारण अधिक वाढुन रोजगारासह स्वयंरोजगाला चालना मिळणार आहे.

            याप्रसंगी अमृत संजीवनीचे पराग संधान,.अतुल काले, .प्रमोद लबडे,भाजपा शहराध्यक्ष दत्ता काले,शिवसेना तालुकाप्रमुख .शिवाजी ठाकरे, . निलेश धुमाळ,माजी नगराध्यक्ष .राजेंद्र सोनवणे, संचालक .प्रदीप नवले,.गोकुळ गंगवाल, सी.ए.भंडारी श्री. देशपांडे, सौ.नंदाताई भंडारे,शिवसेना शहरप्रमुख .सनी वाघ,.विक्रमादित्य सातभाई, अनिल जाधव,.बबलू वाणी, जितेंद्र रणशुर, राहुल सूर्यवंशी, विनोद राक्षे, संदीप देवकर, गणेश जाधव, कैलास खैरे, सागर जाधव, गोपी गायकवाड, अशोक लकारे, पिंकी चोपडा, सतिश रानोडे, भाजपा अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष खालिकभाई कुरेशी, रवींद्र रोहमारे, वैभव गिरमे, नारायण अग्रवाल, जनार्दन कदम, दिपक जपे, अल्ताफ कुरेशी, जगदिश मोरे, विजय चव्हाणके, .रवींद्र शेलार, जयेश बडवे, सोमनाथ म्हस्के, बाळासाहेब आढाव, ज्ञानेश्वर गोसावी, राजेंद्र गंगुले, निलेश बोऱ्हाडे, पप्पू पडियार, रंजन जाधव, चंद्रकांत वाघमारे,युवासेना तालुकाप्रमुख सिद्धार्थ शेळके, उपशहरप्रमुख नितीश बोरुडे, उपतालुकाप्रमुख सागर फडे, उपशहरप्रमुख बालाजी गोर्डे, कुणाल लोणारी, अमोल शेलार, वसीम चोपदार, विजय भोकरे, अमित बांगर, प्रितेश जाधव, शुभम भावसार, निखिल जोशी, हेमंत गोसावी, गौरव लहुरीकर, ऋषीकेश धुमाळ, अक्षय शेलार, आशिष निकुंभ, सनी काळे, रोहन दरपेल, शंकर बिऱ्हाडे, फकीरमंहमद पहिलवान, श्रीकांत बागल, राहुल मोरे, अहमदभाई बेकरीवाले, कैलास शेळके यांच्या सह भाजपा शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत