पहाटेची झोप म्हणजे साखर झोप. झोपेत असताना आवाज कानावरती पडला, मेरे देश की धरती सोना उगले उगले हिरे मोती मेरे देश की धरती तेवढ्यात दीदी बोलल...
पहाटेची झोप म्हणजे साखर झोप. झोपेत असताना आवाज कानावरती पडला, मेरे देश की धरती सोना उगले
उगले हिरे मोती मेरे देश की धरती
तेवढ्यात दीदी बोलली तुझी मैत्रीण आलीय उठ लवकर. मैत्रीण म्हणल्यावर पटकन डोळे उघडले तेव्हा ती बोलली कचऱ्याची गाडी आलीय कचरा नेयला , उठ लवकर कचरा टाकून ये. मला तिच्या बोलण्यानं काही वाईट वाटलं नाही कारण आपण फक्त आपलं घर स्वच्छ ठेवतो पण सफाई कर्मचारी सगळं शहर स्वच्छ ठेवतात. त्यात त्यांना वेतनही जास्त मिळत नाही. ते माझे मित्र-मैत्रीण बनण हे माझे सौभाग्यच...!!!
तेवढ्यात गाडी आली आणि मी मास्क लावून कचरा टाकण्यासाठी खाली गेली. एवढा घाण वास की मला उलट्या येयाला लागल्या मी तिथं पाच मिनिटेही थांबू शकली नाही. मनात आलं की ह्या महिला कसा एवढा वेळ दम काढत असतील? कसला घाण वास हा. जिवावरती बेतण्यासारख काम आहे हे. तरी परिस्थितीमुळे करताय ह्या महिला. त्यांचं स्वतःच आरोग्य धोक्यात घालून!!!
वरती येत असताना दोन महिलेचा संवाद मी ऐकला. ह्या महिला का आपल्याकडून तीस रुपये घेतात? आणि आश्चर्याची गोष्ट अशी की त्या महिलेचे पती मोठ्या IT कंपनीमध्ये काम करत होते. दिवसाला त्यांना एक रुपया देणं एवढं मोठं पण नाही तसे कुठंही आपले पैसे जातात त्याचा कधी विचार नाही करत आपण पण या ठिकाणी नक्की विचार करतो. मी काही न बोलता तिथून निघून आली.
मनात तेच चालू होतं की ह्यांना कधी सम्मान मिळेल? घरात आल्यानंतर दिदीला बोलली आज प्रजासत्ताक दिन आहे ना ग? ती बोलली हो, तुला माहीत नाही का? तुला सुट्टी प्रजासत्ताक दिनामुळेच मिळाली. माहीत आहे मला पण ह्या लोकांना का सुट्टी नाही हे खर तर देशासाठी हे काम करताय.
भारताचा जबाबदार नागरिक म्हणून आपण कधी वागतो का? वाटलं तिथे आपण सगळे कचरा फेकतो आणि नंतर ते कर्मचारी आपण फेकलेला कचरा उचलतात. नंतर आपण खूप ताठ मानेने बोलतो हा त्यांच कामंच आहे ते....किती ही खेदजनक गोष्ट म्हणावी. कोणत्याही ऋतू मध्ये सफाई कर्मचारी त्यांचं काम करतात स्वतःची जीवाची पर्वा न करता.
Covid-19 च्या काळात सगळ्यात जास्त जीव धोक्यात घालून काम केले ते सफाई कर्मचाऱ्यांनी. जेव्हा आपण सगळे घरात घाबरून बसलो होतो तेव्हा ह्या लोकांनी दुसऱ्याच्या घरातुन ओला , सुका कचरा गोळा केला आणि आताही करताय. हॉस्पिटलमधला प्राणघातकी कचरा त्यांनी गोळा केला जीवाची पर्वा न करता . त्या काळात त्यांना योग्य प्रकारे PPE किट ही नाही मिळाले. मुंबई मधली एक सफाई कर्मचारीने पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
हाताने मैल साफ करणाऱ्या देशातील सफाई कामगारांच्या मृत्यूला यापुढे केवळ अपघात मानले न जाता तो व्यवस्थेने केलेला खून मानला जावा.
देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा सेप्टिक टाकीत तीन सफाई कामगारांचा मृत्यू झालेला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. दुर्दैवाने , ही काय एकच घटना नाही.
मॅन्युअल स्कव्हेजर अँड द रिहबिलिटेशन अक्ट (मॅन्युअल स्कव्हेजर अक्ट), 2013 अंतर्गत अश्या प्रकारच्या नोकऱ्यावर बंदी घालणारा कायदा अस्तिवात येऊन नऊ वर्षे झाले. तरीही, देशभरात गटारात आणि सेप्टिक टँकमध्ये गुदमरून सफाई कर्मचार्यांचे मृत्यू अजूनही थांबले नाहीत.
हाताने मैल साफ करणाऱ्या कामाचे निर्मूलन करणाऱ्या 'सफाई कर्मचारी आंदोलन' या संस्थेच्या म्हणण्यानुसार , नोंद झालेल्या मृत्यूपेक्षा प्रत्यक्षात सफाई कामगारांच्या झालेल्या मृत्यूची संख्या खूपच अधिक आहे. 2000 सालापासून 'सफाई कर्मचारी आंदोलन ने' देशभरात सफाई कर्मचार्यांच्या घडलेल्या मृत्यूची नोंद ठेवण्यास सुरवात केली आहे.
जानेवारी ते ऑगस्ट 2017 दरम्यान 123 मृत्यू घडल्याचे सफाई कर्मचऱ्यासाठीच्या राष्ट्रीय आयोगाने म्हंटले होते. वर्तमानपत्रात प्रकाशित झालेला अहवाल आणि काही राज्यसरकारनी स्वतःहून दिलेल्या महितीच्या आधारे, अशा प्रकारे मृत्यूची नोंद करणारा पहिलाच प्रयत्न होता. मात्र 'सफाई कर्मचारी आंदोलन ' ने याच काळात स्वतःची आकडेवारी जाहीर केली, तेव्हा केवळ राजधानी दिल्लीमध्ये 429 मृत्य झाल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा सरकारी माहितीतील चिंताजनक त्रुटी उघडकीस आली.
एमएससिडीएल कायद्यानुसार 'मॅन्युअल स्कव्हेजर ' म्हणजे मानवी मल-मूत्र वाहून नेण्याच्या कामात गुंतलेली किंवा नोकरी करणारी व्यक्ती.
खेदजनक बाब ही की ,मॅन्युअल स्कव्हेजर कायद्याच्या अंमलबजावणीतही किती हलगजरीपणा केला जातो हेच यातून स्पष्ट होते.
ह्या कायद्यानुसार , कोणतीही व्यक्ती, स्थानिक प्राधिकरण किंवा कोणतीही प्रतिनिधी संस्था प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या, कोणत्याही व्यक्तीला गटार किंवा सेप्टिक टाकीच्या धोकादायक साफ-सफाईसाठी कामावर ठेवू शकत नाही, अथवा या कामात कोणत्याही व्यक्तीला गुंतवता येणार नाही. या कायद्यातील नवव्या कलमात, कायद्याचे उल्लंघन केल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा दोन लाख दंड अथवा दोनीही होऊ शकत.
आपण संसदेपर्यंत दलित, सफाई कर्मचारी यांच्यावरती झालेल्या अत्याचारबद्दल बोलतो पण जेव्हा आपल्या डोळ्यासमोर अत्याचार झाला की आपण तिथून नजर चोरून निघून जातो आणि स्वतःला एक जबाबदार नागरिक म्हणून घेतो.
दुर्लक्षित वृत्तीमुळे हाताने मैल साफ करणाऱ्या सफाई कामगारांच्या होणाऱ्या व्यवस्थात्मक खुनाना मृत्यू म्हणून बाजूला सारल जाते, हे लोकशाहीचे अक्षम्य विडंबन म्हणायला हवे.
भारतामध्ये स्वछता अभियान तेंव्हाच यशस्वीरीत्या पार पडेन जेव्हा सफाई कर्मचऱ्याला सम्मान मिळेल.
मनिषा रंजना बाळासाहेब लांबे✍🏻
कोणत्याही टिप्पण्या नाहीत