राहूरी फॅक्टरी/वेबटीम:- वाढदिवसाचा कुठलाही डामडौल न करता चिंचविहिरे येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप गिते यां...
राहूरी फॅक्टरी/वेबटीम:-
वाढदिवसाचा कुठलाही डामडौल न करता चिंचविहिरे येथील सामाजिक कार्यकर्ते व भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप गिते यांनी मागील तीन वर्षांपासून गुहा येथील अनाथ आश्रमातील मुलांसमवेत वाढदिवस साजरा करण्याची परंपरा चालू ठेवत ह्या ही वर्षी आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत साजरा केला असल्याचे प्रतिपादन भाजपा राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी केले आहे.
चिंचविहिरे संदीप गिते हे नेहमीच समाज कार्यात अग्रेसर असतात आणि वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी गुहा येथील अनाथ आश्रमात आपला वाढदिवस साजरा करून शाळेतील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी अमोल भनगडे बोलत होते.
यावेळी कनगर ग्रामपंचायतचे सरपंच सर्जेराव घाडगे,शिवसेना उपतालुका प्रमुख सुधीर झांबरे,विजय कानडे, बबन कोळसे, मारुती नालकर,विजय डूक्रे,मुबारक पठाण, अविनाश मोरे गुहा आश्रमचे व्यवस्थापक पप्पू सपकाळ,गोरख वाणी, अनिल वाणी व विद्यार्थी बांधव याठिकाणी उपस्थित होते. संदीप गिते यांनी उत्तम दर्जाचे शालेय उपयोगी साहित्य उपलब्ध करून दिल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत