सात्रळ/वेबटीम : सात्रळ ग्रामपंचायत च्या वॉर्ड नंबर 4 मधील सात्रळ तांभेरे रस्त्यालगत असलेले सांडपाणी चेंबर वेळोवेळी चोक होत असल्य...
सात्रळ/वेबटीम :
सात्रळ ग्रामपंचायत च्या वॉर्ड नंबर 4 मधील सात्रळ तांभेरे रस्त्यालगत असलेले सांडपाणी चेंबर वेळोवेळी चोक होत असल्याने गटारीत मैलायुक्त सांडपाणी रस्त्यावरून वाहत असून परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वर्दळीचा असलेला हा रस्ता असून वेळोवेळी रस्त्यालगत असलेले चेंबर ओव्हरफ्लो होत असून पादचाऱ्यांना मैलामिश्रीत पाण्यातून येजा करण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रभागातून निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य याचा रस्त्याने ये जा करत असूनही सोयीस्कर रित्या या कडे लक्ष देत नसून ग्रामस्तामध्ये नाराजी व्यत होत असल्याचे चित्र आढळून येत आहे. अधीक माहिती घेतली असता सदर भागातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या बंदिस्त गटारीचे पाईप कमी व्यासाचे असल्याने तसेच चेम्बर उघडे असल्याने आजुबाजुचा कचरा वाऱ्याने उडून चेम्बर मध्ये पडत असून चेम्बर तुंबत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडे परिसरातील नागरिकांनी याबाबद वेळोवेळी तक्रार करूनही जुजबी काम केले जाते. सदरील सांडपाणी चा प्रश्न ग्रामपंचायतने तातडीने सोडविण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत