कोपरगांवच्या तीन युवकांवर महाराष्ट्रातुन अभिनंदनाचा वर्षाव - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोपरगांवच्या तीन युवकांवर महाराष्ट्रातुन अभिनंदनाचा वर्षाव

कोपरगाव/ प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील जवळके नावाचे छोटेसे गाव आणि या गावातली तीन युवक फिरोज  मनियार, अक्षय थोरात अन् सागर दरेकर संगीताच्य...

कोपरगाव/ प्रतिनिधी:-


कोपरगाव तालुक्यातील जवळके नावाचे छोटेसे गाव आणि या गावातली तीन युवक फिरोज  मनियार, अक्षय थोरात अन् सागर दरेकर संगीताच्या क्षेत्रामध्ये स्वतःच नशीब आजमावत आहेत. त्यांच तिसर गाण गर्लफ्रेंड   होशीलका ? हे गाणे नुकतेच  FSA PRODUCTION ह्या युट्युब चॅनेल वर प्रदर्शित झाले आहे.


 आशिष श्रावणी दिग्दर्शित या गाण्यात शाळा वेबसिरीज फेम अनुश्री माने तसेच सेजल अमनेकर, अक्षय थोरात , सागर दरेकर यांनी  अभिनय केला असून प्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक फिरोज मणियार तसेच महाराष्ट्राच्या नामवंत गायिका सोनाली सोनवणे यांनी या गण्यास आवाज दिला आहे.


अधिक माहिती अशी की, यातील फिरोज  हा स्थापत्य अभियांत्रिकी आहे. त्याच्या या स्वप्नाला त्याचे मित्र अक्षय थोरात (एम कॉम) आणि सागर दरेकर  (विद्युत अभियांत्रिकी ) यांची खंबीर साथ मिळत आहे.

घरची बेताची परिस्थिती आणि त्यातून घेतलेले शिक्षण यात नोकरीच्या मागे न लागता तिन्ही युवक एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. आणी त्यांची स्तुती ही  एवढ्यासाठीच त्यांनी कुणाचाही आधार न घेता आपले तिसरे गाणे प्रदर्शित केले. ह्या क्षेत्रामध्ये आजकाल खूप तरुणी- तरुणांचा सहभाग वाढत चाललेला दिसतोय पण तुमच्यात जिद्द आणि त्यासाठी धडपड असणं आवश्यक आहे. हीच जिद्द धडपड घेऊन फिरोज मणियार व त्याच्या सह टीम ने चांगली भरारी घेतली आहे.यापूर्वी त्यांची दोन गाणी सादर झालेले असून त्यातील एक गाणे झी म्युझिक सारख्या मोठ्या वाहिनीने घेतलेले आहे तर त्यांच्या 'FSA PRODUCTION' या निर्मिती अंतर्गत चालणाऱ्या यूट्यूब चैनल वर ही त्यांचे अनेक चाहते आहेत.आज सर्व सुविधा सोयी उपलब्ध असतांना युवक नवीन काही  करण्यास हिम्मत करत नाहीत परंतु आपल्या परिस्थितीला शिक्षणाला कुठेही आडवे येऊ न देता आर्थिक परिस्थितीशी झगडत या युवकांनी जे क्षेत्र निवडले आहे त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी त्याची धडपड करत आहेत ती निश्चितच अभिनंदनीय आहे.फिरोज या क्षेत्रात कसा आला हे विचारला असता साईंच्या दरबारी भजन गात गात निर्माण झालेली आवड पुढे स्वप्न झाली आणि त्यातच करिअर करायचं ठरलं. गीतकार ,संगीतकार आणि गायक ह्या तिन्ही आघाड्यांवर आव्हान पेलताना दोन्ही जिवलग मित्र मोलाची साथ देत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

 परिस्थितीशी सामना करण्याची जिद्द,नवीन शिकण्याची तयारी आणि मेहनती स्वभाव यामुळे हे तारे संगीत क्षेत्राच्या आकाशात नक्कीच चमकतील ही खात्री आहे.


या युवकांच्या प्रयत्नास साईबाबा संस्थांनचे अध्यक्ष नामदार आशुतोष दादा काळे तसेच युवा नेते सुमित दादा कोल्हे,साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायात तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनिष जाधव आदी मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



तरुणाई la वेड लावेल असे song आहे तरुण मनातल्या तरल भावना अगदी अचूक शब्दात टिपलेले हे गाण आहे 

दिग्दर्शन करताना खूप छान वाटल FSA production सोबत करताना.


 - आशिष पुजारी ( डायरेक्टर शाळा वेबसिरीज फेम )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत