कोपरगाव / प्रतिनिधी:- शहरातील गोकर्ण गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून अमृत संजीवनीचे संचालक पराग संधान यांनी दर्शन घेतले. यावेळी ...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
शहरातील गोकर्ण गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीचे औचित्य साधून अमृत संजीवनीचे संचालक पराग संधान यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांचा राज्य गुप्तवार्ता विभागाचे सेवानिवृत्त उपायुक्त तथा मंदिराचे व्यवस्थापकीय अध्यक्ष सुभाष महाजन यांनी यथोचित सत्कार केला. तसेच भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले.
दरवर्षी माघी गणेश जयंतीनिमित्त गोकर्ण गणेश मंदिरात भाविक मनोभावे दर्शन घेण्यासाठी येतात. परंतु, गेल्या दोन वर्षांपासून अनेक निर्बंध आल्याने भाविकांना दर्शन घेता आले नाही. आता सर्व मंदिरे सुरू झाली असून, दर्शन घेता येऊ लागल्याने भाविकांनी मनोभावे श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी उपनगराध्यक्ष योगेश बागुल, सुनील भावसार, श्री.गुजराथी, अनिल भावसार, हरीश शर्मा, विक्रमादित्य सातभाई, निखील जोशी, कुणाल लोणारी, गौरीष लव्हूरीकर, यश काले, आशिष निकुंभ, योगेश अमृतकर आदी उपस्थित होते. कोविड नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रभाग पाचमधील गणेशभक्त व नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत