कोकमठाणमध्ये सुरक्षा रक्षकाचा निर्घृण खून - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

कोकमठाणमध्ये सुरक्षा रक्षकाचा निर्घृण खून

कोपरगाव / प्रतिनिधी:- शहरातील कोकमठाण शिवारात इलेक्ट्रिक टॉवरचे काम चालू असताना एका सुरक्षा रक्षकाने दुसऱ्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखं...

कोपरगाव / प्रतिनिधी:-


शहरातील कोकमठाण शिवारात इलेक्ट्रिक टॉवरचे काम चालू असताना एका सुरक्षा रक्षकाने दुसऱ्या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात लोखंडी घनाचा वार करून निर्घृण खून केला. सदर घटना बुधवारी (ता.२) रात्री १० वाजेच्या सुमारास घडली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांतच सिंघम पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आरोपीला गजाआड केले आहे.


याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोहन युगल बासके व रबीन धनेराम बासके (रा.जोबिसमरा, ता.आंगो, जि. हजारीबाग, रा.झारखंड) या दोघांची कोकमठाण शिवारात इलेक्ट्रिक टॉवरचे काम चालू असलेल्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती.


दरम्यान, दोघांमध्ये काहीतरी वाद होऊन रबीन बासके याने सोहन बासके याच्या डोक्यात लोखंडी घनाचा वार करून निर्घृण खून केला. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मयताचा भाऊ अरुण युगल बासके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुरनं.२३/२०२२ भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.


यानंतर सिंघम अधिकारी वासुदेव देसले यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून आरोपी रबीन बासके यास गजाआड केले आहे. याकामी पोलिसांचे मोठी मदत त्यांना झाली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत