कोपरगांव प्रतिनिधी कोपरगांव तालुक्यात असंख्य दिव्यांग बांधव प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेपासुन वंचित आहेत त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा म...
कोपरगांव प्रतिनिधी
कोपरगांव तालुक्यात असंख्य दिव्यांग बांधव प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेपासुन वंचित आहेत त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळावा म्हणून भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे, तेंव्हा ड यादीतील दिव्यांगांना त्याचा लाभ तातडीने द्यावा अशा आशयाचे निवेदन कोपरगांव तालुका भाजपा दिव्यांग सेलचे अध्यक्ष मुकूंद काळे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती कोपरगांव यांना दिले आहे.
त्यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील निराधारावर घरकुलाचा आधार मिळावा म्हणून प्रधानमंत्री आवास योजना जाहिर करून त्याप्रमाणे प्रत्येक राज्यांना त्याचा निधी वितरीत केलेला आहे. चालु अर्थसंकल्पांत अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ४८ हजार कोटी रूपयांची तरतुद केली आहे. कोपरगांव तालुक्यात अ आणि ब यादीतुन सुटलेल्या दिव्यांगांना घरकुलाचा लाभ मिळावा म्हणून ड यादी तयार केली आहे, त्यात तालुका समितीने पात्र-अपात्र असा भेदभाव न करता दिव्यांगाना तातडीने घरकुलाचा लाभ मिळवुन द्यावा, जेणेकरून त्यांच्या डोक्यावर हक्काचा निवारा उपलब्ध होईल.
जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी तालुक्यातील दिव्यांग बांधवांच्या प्रत्येक अडी अडचणी समजुन घेवुन त्यावर मार्ग काढुन केंद्र व राज्य शासनांच्या विविध योजनांचा लाभ दिव्यांगापर्यंत दिला असल्याचे शेवटी मुकूंद काळे म्हणाले. याप्रसंगी दिव्यांग संघटनेचे जयवंत मरसाळे, संदिप शहाणे, स्वप्नील कडु, शंकर बि-हाडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत