देवळाली/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपालिकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या भूमिगत गटारीच्या कामास आज रविवारी राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत...
देवळाली/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपालिकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या भूमिगत गटारीच्या कामास आज रविवारी राहुरी फॅक्टरी येथील गुरुकुल वसाहत येथे प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.
देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत देवळाली प्रवरा शहरामध्ये सुमारे ५० कोटी रुपये खर्चून होणाऱ्या भूमिगत गटारी मलनिस्सारण कामाचा भूमिपूजन डिसेंबर महिन्यात राज्याचे माजी विरोधी पक्षनेते व आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्या अध्यक्षतेखाली व तत्कालीन नगराध्यक्ष सत्यजित कदम व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
दरम्यान रविवारी गुरुकुल वसाहत भागातील कामकासास शुभारंभास सुरुवात झाली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष तथा आरपीआय जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या हस्ते पूजन पार पडले
यावेळी कुणाल तनपुरे, काशिनाथ रसाळ ,पप्पू जोशी ,अजय पगारे,विक्रम भोपळे इंजिनिअर पृथ्वी चव्हाण,इंजिनिअर थोरात,संदीप गागरे आदिंसह गुरुकुल वसाहत भागातील नागरिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत