राहूरी (प्रतिनिधी)- अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या स्वयंभू पादुकांचे राहुरी शहरात ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता आग...
राहूरी (प्रतिनिधी)-
अक्कलकोट निवासी श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या स्वयंभू पादुकांचे राहुरी शहरात ५ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता आगमन होत आहे. यानिमित्त सर्व श्रीस्वामी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन राहुरी तालुका अक्कलकोट स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अक्कलकोट येथील श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) तर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या स्वयंभू पादुकांचे आगमन राहुरी शहरात शनिवार, दि. ०५/०२/२०२२ रोजी आगमन होत आहे. सदर पालखी राहुरी शहरात मुक्कामी असून सायंकाळी ६ वाजता पालखीचे राहुरी शहरात आगमन होईल. शनी मंदिर येथे स्वयंभू पादूका दर्शनासाठी ठेवण्यात येईल. रात्री ८.३० वाजता महाआरती होणार आहे. तरी राहुरी तालुक्यातील सर्व स्वामी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाच्या नियमांचे पालन करून, सुरक्षित अंतर ठेवावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर वापरावा तसेच शक्यतो कोव्हीडचे दोन लस घेतलेल्यांनीच दर्शनासाठी उपस्थित रहावे, असेही आवाहन स्वामी समर्थ भक्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत