कोपरगाव/वेबटीम:- जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या ३१ जानेवारी सोमवार रोजी जाहीर झाल्या. जिल्ह्याचा विकास करण्यासा...
कोपरगाव/वेबटीम:-

जिल्हा नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या ३१ जानेवारी सोमवार रोजी जाहीर झाल्या. जिल्ह्याचा विकास करण्यासाठी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या समितीवर सामाजिक,शैक्षणिक व प्रशासकीय कामात नेहमी अग्रेसर असणारे विशाल झावरे यांची निवड झाली आहे. विशाल झावरे यांची नियोजन समितीवर निवड झाल्याने जिल्ह्याला युवा चेहरा मिळाल्याचे बोलले जात आहे. जिल्ह्यातील तरुणांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. विशाल झावरे यांचे शिक्षण एमसीए,एमएड असून उच्चशिक्षित असल्याने तालुक्यातील नागरिक योग्य व्यक्तीची निवड झाल्याचे समाधान व्यक्त करीत आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ तर सचिव म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे नियोजन समितीवर काम पाहणार आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्यजी ठाकरे, शिवसेना उत्तरनगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,रावसाहेब खेवरे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला व मला या समितीवर काम करण्याची संधी दिली. या संधीचं सोनं करून दाखवेल. जिल्हा नियोजन निधीअंतर्गत विकास कामे,तसेच विविध योजना,जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रलंबित प्रश्नांना चालना देण्यासाठी काम करणार असल्याचे सांगत झावरे पुढे म्हणाले महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने मोठा असलेला अहमदनगर जिल्हा राज्याला आणि देशाला बहू आयमी दिशा देणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यातील जाणकार,महाविकस आघाडीचे नेते तसेच जिल्ह्यातील जनसामान्यांशी सल्ला मसलत करून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे विशाल झावरे यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत