कोपरगाव/वेबटीम:- निवडणुक आली की शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची आश्वासने दिली जातात मात्र आता ऐन पिकांना पाणी देण्याची वेळ आली असताना वीज वितर...
कोपरगाव/वेबटीम:-
निवडणुक आली की शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची आश्वासने दिली जातात मात्र आता ऐन पिकांना पाणी देण्याची वेळ आली असताना वीज वितरण कंपनी कडून पठाणी पद्धतीने वीज वसुली सुरू असून ही वसुली त्वरित थांबवावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की विविध निवडणूक आली की सर्वच राजकीय पक्ष सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांना मोफत वीज देऊ अशी आश्वासने देतात मात्र शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून सत्तेत गेल्यावर मोफत वीज देण्याच्या आश्वासनांचा विसर पडत आहे आता शेतकरी रब्बीच्या पिकाच्या तयारीत आहे शेतकऱ्यांना डे नाईट क्रिकेट स्पर्धे सारखी कधी दिवसा तर कधी रात्री वीज दिली जाते त्यात देखील वीज पुरवठा अत्यंत कमी दाबाने केला जातो त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत पंप नादुरुस्त होतात तर कधी ट्रान्सफार्मर जळतात ते बसविण्यासाठी वीज मंडळाच्या अधिकारी पैशाची मागणी करतात या उलट पैसे मोजून देखील ट्रान्सफार्मर वेळेवर बसवले जात नाहीत त्यासाठी शेतकऱ्यांना महिना दिड महिना वाट पहावी लागते अशात आता रब्बी पिकाचा मोसम ऐन भरात आला आहे शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून उन्हाळा कांदा ,गहू आदी पिके केली आहेत मात्र वीज वितरण कंपनी कडून ऐन मोसमात जाणीव पूर्वक शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असून वीज बिल भरल्या शिवाय वीज देणार नाही अशी भूमिका घेऊन वीज बिल वसुली सुरू आहे त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून पावसाळ्याचे व उन्हाळ्याचे तीन महिने असे सहा सात महिने शेतकरी जास्त वीज वापर करत नाही मात्र असे असताना सद्या वीज वितरण कंपनी कडून वीज बील भरणा करावा म्हणून वीज वितरण कंपनी कडून शेतकऱ्यांना तगादा लावला जात असून प्रसंगी वीज कनेक्शन कट केले जात आहे खरिपाची पिके निघून गेली आहेत तर रब्बीच्या पिकाकरिता मोठा खर्च झाला आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून वीज वितरण कंपनी च्या अडेल तट्टू धोरणामुळे हाती तोंडी आलेला घास हिरावून घेतला जात आहे मात्र राज्यात शेतकरी हिताचे सरकार झोपेचे सोंग घेत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची कोणीही दखल घेत नाही त्यामुळे वीज वितरण कंपनी ने वीज बिलाची वसुली त्वरित स्थगित ठेवावी अन्यथा वीज वितरण कंपनी च्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले असे या पत्रकात म्हटले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत