देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून ४५ लाखाची दारू पकडल्याने एकच ख...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा हद्दीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून ४५ लाखाची दारू पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत परराज्यातील महाराष्ट्राच्या हदितून जाणारे टैंकर तपासणी करत असताना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार मध्य प्रदेश येथून केरळ राज्यात मद्यार्क घेऊन जाणारे टँकर तपासणी करत असताना हॉटेल जम्मू हिमाचल पंजाबी चौधरी धाबाच्या पाठीमागील मोकळ्या जागेत नगर मनमाड रोड लगत देवळाली प्रवरा शिवार तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी टैंकर क्रमांक MP:09 HH7648 या टँकरमधून मद्यार्क टँकर थे झाकण उपडून पाइपच्या साहाय्याने पिकअप मध्ये असलेल्या 35 लिटर क्षमतेच्या प्लास्टिक कॅनमध्ये पाइपच्या सहाय्याने काढलेले एकूण 280 लिटर मदयार्क पिकअप मध्ये आढळून आले.
सदर पिकअपचा क्रमांक MH 12 LT.4047 असा आहे सदर ठिकाणी आरोपी टैंकर चालक मालक व पिकअप चालक-मालक इ. अंधाराचा फायदा घेत फरार झाले सदरील टैंकर हा ओअसिस डिस्टिलरी लिमीटेड धार (मध्य प्रदेश) येथून युनायटेड डिस्टिलरीज केरळ येथे चाललेला होता. सदर टैंकरमध्ये 30000 लिटर अति शुद्ध मद्यार्क ENA असल्याची कागदपत्रावर नोंद असून टैंकरचा आयात व निर्यात परवाना आहे. परंतु सदर टँकर मधील अतिशुद्ध मद्यार्क थी मोजदाद केली असता मद्यार्क टैंकर मध्ये तफावत असल्याचे दिसून आले .
आयात निर्यात परवाना असलेल्या टँकरचे सील तोडून मद्यार्क काढण्यात आले सदरील मदद्द्यार्क हे बनावट मदय व हातभट्टी गावठी दारू मध्ये मिश्रण करण्यासाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता होती. सदर कारवाई मध्ये दोन वाहनांसह 45,11,360/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर पळून गेलेल्या इसमा विरुद्ध मुंबई दास्वंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त श्री कांतीलाल उमाप साहेब, उषा वर्मा संचालक अमलबजावणी व दक्षता राज्य उत्पादन शुल्क, मुंबई, श्री प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क पुणे व श्री गणेश पाटील अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली श्री नितेश शेंडे उपाधिक्षक राज्य उत्पादन शुल्क, श्री अनिल पाटील निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, श्री गोपाल चांदेकर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक श्रीरामपूर, श्री संजय कोल्हे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कोपरगाव, दुय्यम निरीक्षक श्री के यु छत्रे, नंदू परते व अजित बडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक सर्वश्री के के शेख, आर बी कदम व नारायण तुबे जवान सर्वश्री पी पी साळवे, बी के नागरे व बी बी करंजुले महिला जवान श्रीमती एस आर फटांगरे, वाहन चालक नि जवान श्री विपुल करपे, सुशांत कासुळे व दीपक बर्डे इ. यांनी सदर कारवाई मध्ये भाग घेतला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री गोपाल चांदेकर, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक श्रीरामपूर हे करत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत