आंबी (संदिप पाळंदे) : डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बेलापूर गटातील आंबी अंमळनेर केसापूर परीसरातील ऊस...
आंबी (संदिप पाळंदे) :
डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील बेलापूर गटातील आंबी अंमळनेर केसापूर परीसरातील ऊस उत्पादक शेतकरी आपल्या शेतातील उभा ऊस तुटून कधी जाईल या चिंतेत आहे.
फेब्रुवारी महिना सुरु होऊन उन्हाची चाहूल लागली. परंतू या परिसरातील सुरु ऊस व खोडवा ऊसाचे मोठे प्लाट तोडणीच्या प्रतिक्षेत तसेच उभे आहे. अनेक ठिकाणी ऊसाला तुरे सुद्धा आले आहे.
कर्जबाजारी होऊन थंडी वाऱ्यात ऊसाला वर्षभर पाणी देऊन शेतात ऊसाचे पिक जोमाने उभे केले. त्या उसाच्या तोडणी अभावी अशी राळ होऊन नुकसान होणे हे बळीराजाला न परवडणारे आहे.
राहुरी, देवळाली प्रवरा, कोल्हार व बेलापूर या चार गटावर या राहुरी तालुक्याची कामधेनू असलेला सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. त्यात बेलापूर गटातील स्व. वाघुजी रामजी पाटील हे संस्थापक प्रर्वतकातील एक आहे. स्व. शिवराम राजुळे, भास्करराव जाधव हे संचालक तर स्व. भास्करराव कुंडलिक कोळसे यांनी या गटातून चेअरमन तर स्व. के .डी. दादा भगत यांनी व्हा. चेअरमन भूषविले होते. अलीकडच्या काळात स्व. तुकाराम पवार यांना जेष्ठ संचालकाचा मान मिळाला. कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष ही पदे दादा, भाऊ, नाना या कोणत्या गटाकडे व कुणाला द्यायचे? त्याची रणनिती या बेलापूर गटातून आखली जात होती.
तनपुरे कारखान्याच्या राजकारणात छाप असणाऱ्या याच बेलापूर गटातील नेते व कार्यकर्ते मंडळी यांच्या शेतातील उभ्या उसाचे प्लॉट तोडणीच्या प्रतिक्षेत तसेच उभे आहेत हे उघड्या डोळ्यांनी पाहत असतील तर सामान्य शेतकऱ्यांचे काय? असा सवाल उपस्थीत केला जात आहे. या भागात ऊसतोडणी मजुराची संख्या अपुरी आहे. असे असले तरी इतर गटाचा प्रोग्राम पुढे गेला असल्यास त्या गटातील ऊसतोडणी मजुराच्या टोळ्या या गटात आणून या भागातील ऊस तोडणी वेळेवर करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी या गावांतील शेतकऱ्यांनी कारखान्याचे अधिकारी पदाधिकारी यांचेकडे केली आहे हे मात्र तितकेच खरे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत