कोपरगाव/वेबटीम:- गोदामाई प्रतिष्ठान तर्फे गेल्या तीन वर्षांपासून कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी घाटची स्वच्छता मोहीम सुरू असून येत्य...
कोपरगाव/वेबटीम:-
गोदामाई प्रतिष्ठान तर्फे गेल्या तीन वर्षांपासून कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या गोदावरी नदी घाटची स्वच्छता मोहीम सुरू असून येत्या शनिवारी म्हणजेच दि ५ फेब्रुवारी २०२२ रोजी १५० वा आठवडा असून या स्वच्छता मोहिमेत प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेता चिन्मय उदगिरकर प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याची माहिती गोदामाई प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष व स्वच्छता दूत आदिनाथ ढाकणे यांनी दिली आहे.
या वेळी ढाकणे यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, गेल्या तीन वर्षांपूर्वी साई बाबा संस्थान चे माजी विश्वस्त सचिन तांबे, डॉ विनया ढाकणे, विजय सांगळे, सौरभ मुंगसे,निलेश पाटील, सोमनाथ पाटील, प्रज्वल ढाकणे व वैष्णवी ढाकणे आदी सदस्यांना सोबत घेत स्थापन केलेल्या गोदामाई प्रतिष्ठान तर्फे कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदीच्या किनाऱ्याची दर आठवड्याला स्वच्छता केली जाते. येत्या शनिवारी या स्वच्छता मोहिमेस १५० आठवडे पूर्ण होत असून या निमित्ताने प्रसिद्ध सिनेअभिनेते चिन्मय उदगिरकर, नमामी गोदाचे अध्यक्ष राजेश पंडित, कैलास शेठ ठोळे, नारायणशेठ अग्रवाल हे सहभागी होणार असून परिसरातील स्वछता प्रेमी व गोदामाई च्या सेवकांनी शनिवारी ठीक सकाळी ९.३० वाजता सहभागी होत गोदामाई स्वच्छता मोहिमेच्या १५० व्या आठवड्यात आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन गोदामाई प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत