नगरपालिकेच्या उदासीनते मुळे शहरातील नागरिक घरकुल योजने पासून वंचित:- अँड.नितीन पोळ - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगरपालिकेच्या उदासीनते मुळे शहरातील नागरिक घरकुल योजने पासून वंचित:- अँड.नितीन पोळ

कोपरगाव/वेबटीम:- कोपरगाव शहरा तील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे उतारे नसल्याने अनेक नागरिकाना घरकुल योजनेपासून वंचित राहावे ल...

कोपरगाव/वेबटीम:-



कोपरगाव शहरा तील झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे उतारे नसल्याने अनेक नागरिकाना घरकुल योजनेपासून वंचित राहावे लागले आहे याची खंत वाटते असे मत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की केंद्र व राज्य सरकार ने प्रत्येक बेघर नागरिकांना घरकुल मिळावे म्हणून पंतप्रधान आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना सुरू केली त्याचा लाभ अनेक नागरिकांना मिळाला असला तरी या योजनेत सहभागी होण्यासाठी हक्काची जागा लागते

शहरी भागात सरकारी जागेवर राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे उतारे द्यावे असा शासन निर्णय आहे त्या साठी उच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आहेत असे असताना कोपरगाव शहरातील बहुसंख्य नागरिक सुभाष नगर,हनुमान नगर, इंदिरा नगर,लक्ष्मी नगर,गजानन नगर, खडकी,लिंबारा मैदान,येवला रोड आदी भागात सरकारी जागेवर सुमारे पन्नास वर्षांपासून  अतिक्रमण करून राहत आहेत

शासन निर्णयाप्रमाणे या अतिक्रमण धारकांच्या जागेचा सर्व्हे मा तहसीलदार अधीक्षक तालुका भूमी अभिलेख व मुख्याधिकारी यांच्या समिती कडून करण्यात येऊन हक्काचे सातबारा उतारे वाटप करावे असा आदेश आहे यापूर्वी सन 2008 साली लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने  या अतिक्रमण धारकांचा सर्व्हे करून हक्काचे उतारे द्यावेत अशी मागणी केली होती मात्र मागील विधानसभा निवडणुकीच्या आधी या विषयावर थातूर मातूर सुरुवात करण्यात आली मात्र अद्याप या अतिक्रमण धारकांना कोणतेही उतारे दिले गेले नाही या उलट जिल्ह्यातील श्रीरामपूर, राहता, संगमनेर,नेवासा राहुरी आदी नगरपालिका हद्दीतील नागरिकांना हक्काचे उतारे व घरे देखील मिळाली आहेत मात्र कोपरगाव नगर पालिकेच्या उदासीन धोरणामुळे कोणालाच उतारे प्राप्त झाले नाहीत त्यामुळे अनेक नागरिक इच्छा असूनही घरकुल योजनेचा लाभापासून वंचित आहेत तर ज्या नागरिकांची आर्थिक स्थिती सधन आहे ज्यांनी स्वतः खर्च करून प्लॉट खरेदी केले ते नागरिक या योजनेचा लाभ घेताना दिसत आहेत मागील पाच वर्षांच्या कालावधीत या वॉर्डाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कोणत्याच नगर सेवकांनी हक्काच्या सातबारा उताऱ्या साठी नगर पालिकेत आवाज उठवला नाही याउलट आता नगर निवडणूकी मध्ये पुन्हा याच मुद्द्यावर जनतेकडून मते मागितली जातील यात शंका नाही त्यामुळे कोपरगाव शहरातील अतिक्रमण धारकांना त्वरित हक्काचे उतारे देण्यात यावे अन्यथा या भागातील जनता नगर पालिका निवडणुकीत सत्ता धारी व विरोधी नगर सेवकांना जाब विचारल्या शिवाय राहणार नाही असेही या पत्रकात म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत