राहुरी/प्रतिनिधी:- राहुरी तालुक्यातील पश्चिम भाग अतिदुर्गम व डोंगराळ असा भाग म्हणून ओळखला जातो. पश्चिम भागात चिकलठाण, बुळे पठार कोळेवाडी, म्...
राहुरी/प्रतिनिधी:-
राहुरी तालुक्यातील पश्चिम भाग अतिदुर्गम व डोंगराळ असा भाग म्हणून ओळखला जातो. पश्चिम भागात चिकलठाण, बुळे पठार कोळेवाडी, म्हैसगाव, दरडगाव थडी, अशी एकूण पाच गावे येतात. तसेच त्याच्यांजवळच तहाराबाद मंडल महसूल कार्यक्षेत्रात तहाराबाद, वाबळेवाडी, वरशिंदे, गडधे आखाडा, चिंचाळा आशी मोठी लोकसंख्या असलेली गावे राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात येतात. हा भाग अतिदुर्गम डोंगराळ आहे. तालुक्याला मूलभूत समस्या किंवा पोलीस स्टेशन अंतर्गत समस्या घेऊन येण्यासाठी म्हैसगाव सजा अंतर्गत महसूल विभागातील गावांना ४० ते ५० किलोमीटर अंतर पार करून तालुक्याला यावे लागते, तसेच या भागातून मुळा नदी गेल्याने वाळू व्यवसाय तसेच कौटुंबिक कलह, छोट्या मोठ्या चोर्या असंख्य प्रकार घटना घडत आहेत, अवैध धंदे यांचे प्रमाण अधिक आहे. या भागाला स्वतंत्र पोलीस दुरक्षेत्र (पोलीस स्टेशन) होणे खूप गरजेचे आहे, म्हणून आपल्या राहुरी पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस दुरक्षेत्र म्हैसगाव सजा महसूल विभागात अत्यंत गरजेचे आहे.
राहुरी तालुक्याच्या पश्चिम भागात वंचित, बहुजन, आदिवासी समुह हा अधिक प्रमाणात वास्तव्य करत आहे अशा वास्तव्य करणाऱ्या एखादी तक्रार देण्यासाठी तालुक्याला यायचे असल्यास या भागातील समुहास आर्थिक झळ होताना दिसत आहे. म्हणून आपल्या पोलिस स्टेशन अंतर्गत पोलीस दुरक्षेत्र (आऊट पोस्ट) या भागात सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
यानिमित्ताने श्रमिक मुक्ती दल लोकशाहीवादीच्या वतीने दिनांक ४ फेब्रुवारी २०२२ रोजी मान. तहसीलदार, तहसील कार्यालय राहुरी यांना लेखी निवेदन देण्यात आले तहसील कार्यालयाच्या वतीने मान.देशमुख सर यांनी निवेदन स्वीकारले. तर मान. पोलीस निरीक्षक, राहुरी पोलीस स्टेशन कार्यालय राहुरी यांना देखील प्रत्यक्ष निवेदन देण्यात आले, राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने संबंधित ठाणे अंमलदार यांनी लेखी निवेदन स्वीकारले, लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर ,पोलीस अधीक्षक कार्यालय, अहमदनगर यांनादेखील लेखी निवेदनाद्वारे कळविले जाणार आहे व योग्य पाठपुरावा केला जाणार आहे असे श्रमिकचे प्रमुख संदीप कोकाटे यांनी सांगितले. श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने लेखी निवेदन देण्यासाठी संदीप कोकाटे, मच्छिंद्र दुधवडे, केदार तावजी, वर्षाताई बाचकर, चिमाबाई केदार, गोविंद वारे, संगीताबाई केदार, किसनाबाई केदार, तुकाराम केदार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
म्हैसगाव महसूल सजा हद्दीतील ग्रामपंचायतींनी जनतेची मूलभूत समस्या लक्षात घेता, राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील ग्रामपंचायतींच्या वतीने संबंधित वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयांना ग्रामसभा ठराव करून संबंधित प्रशासकीय कार्यालयास कळवुन,पोलिस दुरक्षेत्र होणं अत्यंत महत्त्वाचे आहे. ही मागणी करुण सतत पाठपुरावा करत राहुन या भागातील जनतेला कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी न्याय देण्यासाठी पुढाकार घेणं महत्त्वाचं आहे.
संदीप कोकाटे, श्रमिक मुक्ती दल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत