स्नेहलता कोल्हेच्या उपस्थितीत रविवारी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्नेहलता कोल्हेच्या उपस्थितीत रविवारी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन

कोपरगाव/वेबटीम:-  माजी आमदार  स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी शहरातील संत नरहरी महाराज म...

कोपरगाव/वेबटीम:-



 माजी आमदार  स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी शहरातील संत नरहरी महाराज मंदिर येथे संध्याकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत मकरसंक्रांती निमित्त हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई व माजी नगरसेविका पद्मावती योगेश बागुल यांनी दिली आहे.



 गेल्या दोन वर्षांपासून कोरोना  या  महाभयंकर संसर्गजन्य आजारामुळे मनात इच्छा असून देखील आपण कोणतेच  सण मोठ्या उत्साहात एकत्रितपणे येऊन साजरे करू शकलो नाही. परंतु आता काही अंशी का होईना कोरोना या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व शासकीय नियमांचे पालन करत कोपरगाव शहरातील सर्व महिलांचे प्रत्यक्षात मनोमिलन व्हावे या अर्थाने मकरसंक्रांती या सणाचे औचित्य साधत हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन कोपरगाव शहरातील संत नरहरी महाराज मंदिर येथे रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी प्रभाग क्रमांक पाच च्या वतीने ठीक संध्याकाळी ५ ते रात्री ८ या वेळेत आयोजित करण्यात आले असून तरी शहरातील सर्व महिलांनी या हळदी-कुंकू समारंभास  उपस्थित राहावे तसेच कार्यक्रम स्थळी ठेवलेल्या अल्पोहाराचा आस्वाद घ्यावा असे आवाहन माजी नगराध्यक्षा  ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई व माजी नगरसेविका पद्मावती योगेश बागुल यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत