राहुरी(वेबटीम) गेल्या तीन वर्षांपासून कोंढवड- तांदुळवाडी येथील मुळा नदीवरील पुलाची दुरूस्ती करण्याबाबत क्रांती सेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद...
राहुरी(वेबटीम)
गेल्या तीन वर्षांपासून कोंढवड- तांदुळवाडी येथील मुळा नदीवरील पुलाची दुरूस्ती करण्याबाबत क्रांती सेनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग राहुरीचे उपअभियंता तसेच आपले सरकारच्या माध्यमातून पुल दुरुस्तीच्या मागणीचा पाठपुरावा करण्यात येत होता. या पुलाचे जिल्हा वार्षिक योजनेतून लवकरच दुरुस्तीचे काम व कोंढवड येथील उर्वरित रस्त्यांचे काम सुरू झाल्याने अखेर क्रांतीसेनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
राहुरी तालुक्यातील कोंढवड तांदूळवाडी येथील मुळा नदीवरील पुलाचे स्टील उघडे पडुन काही ठिकाणी या पुलाचा भाग कोसळला होता. या पुलावरून कोंढवड, शिलेगाव, तांदुळवाडी व आसपासच्या परिसरातील नागरिक, विद्यार्थी ये-जा करतात. या उघड्या स्टील व कोसळलेल्या भागामुळे हा पुल वाहतूकीसाठी धोकादायक बनल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे या पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता असून या पुलाची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. याकामी जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे तत्कालीन उपअभियंता स्व. राजेश इवळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या पुल व रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे क्रांतीसेनेच्या वतीने प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, गोरक्षनाथ म्हसे, सुरेशराव म्हसे, किशोर म्हसे, राहुल म्हसे, विष्णू म्हसे, मंजाबापु म्हसे, हौशिनाथ म्हसे, राजु पेरणे, सुनिल हिवाळे, शिलेगावचे प्रथम लोकनियुक्त माजी सरपंच पांडुरंग म्हसे, माजी सरपंच रमेश म्हसे, संदीप उंडे, अनिल म्हसे, धनंजय म्हसे, अनिल पिसाळ, दिपक नवले, बहिरीनाथ म्हसे, बजरंग म्हसे, ऋषिकेश औटी, अरविंद म्हसे, अक्षय म्हसे आदींसह ग्रामस्थांनी आभार मानले आहेत. सदर काम सुरू असतानी स्थानिक ग्रामस्थांच्या सुचनाचे पालन केल्याबद्दल विद्यमान उपअभियंता संजय खेले व शाखा अभियंता आप्पासाहेब हंचे, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक किरणकुमार लांडे आदींचेही ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत