कोपरगाव / प्रतिनिधी पूणे जिल्ह्यात नुकताच हिंदू धर्माची युवती स्वाती व मुस्लिम युवक आरिफ यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. पुरोगामी महाराष्ट्रा...
कोपरगाव / प्रतिनिधी
पूणे जिल्ह्यात नुकताच हिंदू धर्माची युवती स्वाती व मुस्लिम युवक आरिफ यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. पुरोगामी महाराष्ट्रात असे अनेक आंतरधर्मीय विवाह झालेले आहेत. त्यानंतर त्या हिंदू मुलींचे आयुष्यात पुढे काय होते? याची मुख्यमंत्री म्हणून दखल घ्यावी, अशा मागणीचे निवेदन कोपरगावचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी पाठविले आहे.
सदर निवेदनात म्हंटले आहे की,
आंतरधर्मीय विवाह सोहळ्याचे शिवविवाह असे नामकरण करणे फारच निषेधार्ह आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षाही यावेळी उपस्थित होत्या. शिवविवाह नाव देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबनाच केलेली आहे. पण जर मुलगी मुस्लिम व मुलगा हिंदू असता तर स्वतःला पुरोगामी म्हणविणाऱ्यांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे धारिष्ट्रय दाखविले असते का? असा सवाल केला आहे.
शिवविवाह असे नामकरण केलेल्या विवाहास उपस्थित असलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई केली पाहिजे. तसे होणार नसेल तर या पुरोगामी महाराष्ट्रात मुस्लिम मुलींचे विवाह हिंदू मुलांशी लावून देण्याचे महान कार्य महिला आयोगाच्या अध्यक्षा करणार आहेत का? याचीही विचारणा मुख्यमंत्री म्हणून आपण करावी असे आवाहन करत शिवविवाह असे संबोधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केलेला आहे. त्याची गंभीर दखल घ्यावी व यानंतर तरी पुन्हा असे होणार नाही याची दक्षता घ्यावी असे सूचित केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत