देवळाली प्रवरा(वेबटीम):- राहुरी तालुक्यातुन प्रथमच शारीरीक शिक्षण विषयात डाँक्टरेट मिळविणारा देवळाली प्रवरा येथिल आप्पासाहेब मुकुंद ...
देवळाली प्रवरा(वेबटीम):-
राहुरी तालुक्यातुन प्रथमच शारीरीक शिक्षण विषयात डाँक्टरेट मिळविणारा देवळाली प्रवरा येथिल आप्पासाहेब मुकुंद उर्फ राजेंद्र चव्हाणयाने मान मिळविला आहे.राजस्थान विद्यापिठातुन डाँक्टरेट मिळविली आहे
आप्पासाहेब चव्हाण याने अहमदनगर जिल्ह्यातील बाँस्केट बाँल खेळाडूवर वर्तुळाकार प्रशिक्षणचा होणाऱ्या परीणामाचा अभ्यास विश्लेषणात्मक सादर केला आहे.गेल्या चार वर्षा पासुन डाक्टरेटसाठी प्रयत्न करीत होते. डाँक्टरेटसाठी डाँ.बळवंत गोपीसिंग (मुंबई ), डाँ.अनुश्री नाहुरकर (नागपूर),डाँ.दिपक माने (पुणे),डाँ.अंजु सिंग,प्रा.विनायक काळे, प्रा. शिवाजीराव ढोकणे,राहुरी महाविद्यालयाचे शारीरीक शिक्षण संचालक प्रा.पंडीतराव धुमाळ यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. महिपती महाराज दिंडी सोहळ्याचे चोपदार मुकुंद उर्फ राजेंद्र चव्हाण (वडील)यांचेही मार्गदर्शन लाभले.
गेल्या १० वर्ष राहुरी फॅक्टरी येथील श्री.छञपती शिवाजी अभियांञिक महाविद्यालय येथे चव्हाण यांनी शारीरीक शिक्षण संचालक व अहमदनगर क्रिडा विभागाचे सह सचिव म्हणून काम केले आहे.चव्हाण यांचे आंतरराष्ट्रीय व नँशनल परीषदेमध्ये विविध लेख प्रकाशित झाले आहेत.अखिल भारतीय अंतर विद्यापीठ खेळाडू म्हणून निवड झालेली आहे.
राहुरी तालुक्यात प्रथमच शारीरीक शिक्षण विषयात डाँक्टरेट मिळविणारे चव्हाण हे पहिले विद्यार्थी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत