राहुरी/वेबटीम:- महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील ना. बाळासाहेब थोरात यांच...
राहुरी/वेबटीम:-
महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील ना. बाळासाहेब थोरात यांचे कट्टर समर्थक सोपान रंगनाथ जाधव मित्र मंडळाच्या वतीने पाथरे खुर्द येथे साजरा करण्यात आला
या वेळी सोपान जाधव मित्र मंडळाच्या वतीने फटाक्यांची आतीषबाजी करण्यात आली.गावात वृक्षारोपण करून खाऊचे वाटपही करण्यात आले.
या वेळी बोलताना सोपान जाधव यांनी सांगितले की, आमच्या मित्र मंडळाच्या वतीने सलग २०वर्षापासुन हा उपक्रम साजरा करण्यात येत आहे. ना.बाळासाहेब थोरात हे अजातशत्रू अस व्यक्तीमत्व आहे.राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रातील ते आदर्श आहेत.म्हणूनच आम्ही दरवर्षी ना.थोरात याचा वाढदिवस साजरा करतो.
यावेळी मोहन टेकाळे ,अर्जन जाधव,हारिभाऊ जाधव,चांगदेव टेकाळे,बाळासाहेब नाईक,सचिन काळे,राजु टेकाळे ,दिलीप टिके, सुरेश टेकाळे, रणछोडदास जाधव,साहेबराव जाधव,शरद जाधव,रमेश टेकाळे, अनिल टेकाळे, किरण कदम,नारायण विटनोर, अप्पा काळे,विजय जाधव,गंगाधर शिरसाठ, शंकरभाई जाधव, यासहअनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत