राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कट्टर शिवसैनिक तथा युवा सेनेचे माजी पदाधिकारी संतोष चोळके यांनी शिवसेनेला ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील कट्टर शिवसैनिक तथा युवा सेनेचे माजी पदाधिकारी संतोष चोळके यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला असून चोळके यांची राहुरी तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
राहुरी कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषद व वंचित बहूजन आघाडीत कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे,महासचिव अनिल जाधव, मार्गदर्शक डॉ.जालिंदर घिघे,गौतम पगारे,युवा जिल्हाध्यक्ष प्रविण आल्हाट आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी देवळाली प्रवरा येथील युवा सेनेचे माजी पदाधिकारी संतोष चोळके यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत आपल्या समर्थकांसह जाहीर प्रवेश करत वंचितचा झेंडा हाती घेत प्रस्थापितां विरोधात सर्वसामान्य वंचितांसाठी आवाज उठवणार असल्याचे चोळके यांनी जाहीर केले.
यावेळीबवंचित बहुजन आघाडी हा पक्ष सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी व न्यायासाठी सदैव आघाडीवर राहील प्रशासनाकडे न्याय हक्कासाठी भांडणारा पक्ष असून वंचित बहुजनांना आधार देत भक्कमपणे पाठीशी राहील तालुक्यात वंचित बहूजनचे वादळ घोंगावत असून अनेकजण पक्ष प्रवेश करत आहेत राहुरीत वंचित बहूजन आघाडी आगामी काळात आघाडीवर राहणार असा आशावाद महासचिव अनिल जाधव यांनी व्यक्त केला.
जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे यांनी सांगितले की, वंचित बहूजन आघाडी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात झंझावात उभा करत असून अनेकजण आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत पक्षाच्या अजेंड्यानुसार सर्वांनी कार्यरत राहून समाजातील उपक्षेती वंचित घटकांसाठी आवाज उठवावा पक्ष नेहमी आपल्या सोबत राहील आगामी निवडणूकांमधे प्रस्थापितांविरोधात वादळ उभे करुन वंचित बहूजन आघाडी नगर जिल्ह्यात आपला जलवा दाखवणार असल्याने पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्ते व नव्याने प्रवेशीत झालेल्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले.
याप्रसंगी राहुरी शहराध्यक्ष पिंटूनाना साळवे,निलेश जगधने,शिवा मोरे,महेश पाखरे,आकाश दिवे,अभि सांगळे,संजय बर्डे,साईनाथ बर्डे,पप्पू बर्डे,सोमनाथ किर्तने आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
*'त्या' कुटुंबाचा वंचित आघाडीत प्रवेश*
खासगी सावकारकीमुळे हतबल होऊन आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या देवळाली प्रवराच्या संदीप कदम या युवकाने कुटुंबासह प्रवेश करत वंचित बहूजनचे आभार माणत येथुन पुढे वंचित घटकांसाठी लढणार असल्याचे घोषीत केले.तसेच मनिषा साळवे,मिना थोरात,विशाल विधाटे सह आदींनी वंचित बहूजन आघाडी आमच्यासाठी आधार ठरल्याचे सांगत पक्षप्रवेश केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत