राहुरी फॅक्टरी(वेबटीम) सहकारमहर्षि सीताराम गायकर पाटिल यांच्या वाढदिवसनिमित्त अकोले राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस कडून जिल्ह्याभारत विविध...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
सहकारमहर्षि सीताराम गायकर पाटिल यांच्या वाढदिवसनिमित्त अकोले राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस कडून जिल्ह्याभारत विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन साजरा केला.
सहकारमहर्षी सिताराम पाटील गायकर यांनी आपल्या जीवन प्रवासात ऊस तोड कामगार ते अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पदापर्यंत आणि पुढे अहमदनगर जिल्हा बँकेच्या चेअरमन पदापर्यंत संघर्षमय प्रवास केला आहे. यातून त्यांनी जिल्ह्यात आणि तालुक्यात तसेच राज्यात मोठी जिवाभावाची माणस या जीवन प्रवासातून कमावली आहेत. सहकारमहर्षी सिताराम पाटील गायकर यांची खासियत म्हणजे त्यांच्या जीवभावांच्या यादीत फक्त जुने जाणते बुजुर्गच नाही तर, तरुणाईचा सुध्दा त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे.जिल्ह्यातही जे गायकर साहेब यांच्या जवळ गेले तर ते पुन्हा त्यांना सोडून जात नाहीत असे अनेक त्यांच्या सहवासातील व्यक्ती बोलून दाखवत असतात.
पुणे विभाग अध्यक्षा संध्या सोनवणे यांचा संकल्पनेतून जिल्हा कार्यध्यक्ष प्रभात चौधरी व जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद कर्नावट यांचा मार्गदर्शनाखाली आज नूतन माध्यमिक विद्यालय देवळाली प्रवरा येथे गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमस्थळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस चे शहराध्यक्ष ऋषिकेश संसारे , जिल्हा सोशल मिडिया अध्यक्ष जगदीश ढूस , पंकज खर्डे पाटिल , अमोल आंबिलवादे , विद्यालयाच्या मुख्यध्यपिका साळे मॉडम , जेजुरकर मॅडम व सर्व स्टाफ उपस्थिथ होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत