अहमदनगर(प्रतिनिधी):- गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेल्या झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रशासकीय हालचालींना अ...
अहमदनगर(प्रतिनिधी):-
गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेल्या झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रशासकीय हालचालींना अखेर वेग आला आहे. जिल्ह्यातील 85 गट आणि 170 गणांचा कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या असून, हा आराखडा नगरहून 9 तारखेपर्यंत आयोगाकडे पाठवला जाणार असल्याचे समजते.
जिल्हा परिषद निवडणुका कधी लागणार याकडे सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे. अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी, कॉंग्रेस, सेना, भाजप याशिवाय इतर पक्षांनी त्या दृष्टीने तयारी केली आहे.
दरम्यान जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक साठी प्रशासकीय हालचालिंना वेग आला असून ८५ जिल्हा परिषद गट व १७० गणांचा कच्चा आराखाडा तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने प्रशासनाला दिला असून ९ फेब्रुवारीपर्यंत कच्चा आराखडा निवडणूक आयोगाकडे पाठविला जाणार असल्याचे समजते.
यंदा नवीन कोणते गट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून राहुरी तालुक्यात उंबरे जिल्हा परिषद गट अस्तित्वात येणार याकडे इच्छुक नजर ठेवून आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत