देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूकीचा बिगुल वाजण्यास अद्याप सुरू होत नाही तोच पक्षांतराचे वारे वाहू लागले असून देवळा...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूकीचा बिगुल वाजण्यास अद्याप सुरू होत नाही तोच पक्षांतराचे वारे वाहू लागले असून देवळाली प्रवरातील कट्टर शिवसैनिक तथा युवा सेनेचे माजी तालुकाध्यक्ष संतोष चोळके यांनी वंचित बहूजन आघाडीची वाट धरली असून त्यांना वंचितची मोठी जबाबदारी दिली जाणार आहे.
येत्या काही दिवसांवर देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणूक होत असून सर्वच पक्षांनी राजकीय आखाड्यात उडी घेण्यासाठी डाव आखण्यास सुरुवात केली आहे.
शिवसेनेशी गेल्या अनेक वर्षांपासून एकनिष्ठ असलेले व शिवसेनेच्या अनेक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणारे देवळाली प्रवरा येथील संतोष चोळके यांनी सध्या शिवसेनेच्या वरीष्ठ पदाधिकाऱ्यांवर नाराज होऊन शिवसेनेला जय महाराष्ट्र करत वंचित आघाडीची कास धरली आहे. चोळके यांना वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते.
देवळाली प्रवरात पूर्वीपासून ठराविक काही शिवसैनिकांनी पक्षासाठी योगदान दिले आहे व आजही देत आहेत.त्यापैकी संतोष चोळके यांची ओळख आहे. परंतु वरिष्ठ पदाधिकारी निष्ठावंतांना विश्वासात न घेता जे साधे शिवसेनेचे सभासद नाही अशांचे ऐकून स्थानिक पातळीवर निर्णय घेत असून त्यांनाच किंमत देत असल्याने चोळके यांनी शिवसेनाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेऊन वंचित आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला असुन त्यांना तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते.
दरम्यान शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून व नवख्याना सोबत घेऊन पक्षाचे काम करत राहिले तर येत्या काही दिवसात देवळाली प्रवरासह परिसरातील ३२ गावांंत सेनेला घरघर लागण्याची शक्यता आहे.
याबाबत संतोष चोळके यांच्याशी आधिक माहिती घेण्यासाठी 'आवाज जनतेने' संपर्क साधला मात्र संपर्क होऊ शकला नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत