कोपरगाव / प्रतिनिधी:- लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांना निर्बंध असल्याने महिलांना एकत्र येता नव्हते. परंतु, सद्यस्थितीत कोविडचा प्रादुर्भ...
कोपरगाव / प्रतिनिधी:-
लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक कार्यक्रमांना निर्बंध असल्याने महिलांना एकत्र येता नव्हते. परंतु, सद्यस्थितीत कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक पाचच्या नगरसेविका ऐश्वर्या सातभाई व पद्मावती बागुल यांनी नुकतेच हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शहरातील नरहरी विठ्ठल मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. त्यांना आयोजकांच्यावतीने तीळगुळ व भेटवस्तू (वाण) देण्यात आले. यानिमित्ताने महिलांना एकत्र येता आल्याने सर्वांनी मनसोक्त गप्पागोष्टी केल्या. या कार्यक्रमामुळे महिलांनी आयोजकांचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत