राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी) आजादी का अमृतमहोत्सव २०२१-२२ या अभियानांतर्गत राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय ...
राहुरी फॅक्टरी(प्रतिनिधी)
आजादी का अमृतमहोत्सव २०२१-२२ या अभियानांतर्गत राहुरी फॅक्टरी येथील विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालय यांच्यावतीने राहुरी शहरात रविवार दिनांक ६ फेब्रुवारी पहाटे ६ ते ७ या वेळेत महिलांसाठी मोफत रक्ततपासणी शिबीर तर ७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत नर्सिंग होम येथे मोफत अभ्यंग व स्वेदन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
आजादी का अमृत महोत्सव अभियानाअंतर्गत सर्वत्र विविध उपक्रम राबविले जात असताना विवेकानंद नर्सिंग होमचे आयुर्वेद महाविद्यालय व चिकित्सालयाच्यावतीने विविध आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
रविवार ६ फेब्रुवारी २०२२ रोजी राहुरी शहरातील गोकुळ कॉलनी येथील नगरपालिकेच्या योगा भवनात सौ.मंजिरी रिसगुड ह्या योगा घेणार असून महिलांसाठी मोफत रक्त तपासणी करणार आहे.
तसेच सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० ते ४ पर्यन्त विवेकानंद नर्सिंग होम येथे पंचकर्म विभागामार्फत मोफत अभ्यंग व स्वेदन शिबिर संपन्न होणार आहे. सदर पंचकर्म चिकित्साच्या मदतीने वातव्याधी, संधीगत वात, आमवात, निद्रकार, रक्ताभिसरण, शरीराचा वर्ण उजळणे, डोळ्याचे आरोग्य सुधारणे, कामामुळे येणारा थकवा कमी होणे आदिसाठी मदत होणार आहे.
तरी परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन अधिक्षक डॉ.बी.आर.पगिरे, प्राचार्य डॉ.व्ही.एस.कड, उपप्राचार्य डॉ.एस.के.बांगर, पंचकर्म विभागप्रमुख डॉ.सी.एस.निबे आदिंनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत