सात्रळ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अनंत केदारे यांना महाराष्ट्र शासनाचा 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे' राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ महाविद्यालयाचे प्रा. डॉ. अनंत केदारे यांना महाराष्ट्र शासनाचा 'लोकशाहीर अण्णाभाऊ साठे' राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

सात्रळ/वेबटीम:- लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ (ता.राहुरी) येथ...

सात्रळ/वेबटीम:-



लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ (ता.राहुरी) येथील सहयोगी प्राध्यापक डॉ. अनंत नानाजी केदारे यांच्या 'वाग्दान'  काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

        प्रा. डॉ. अनंत केदारे यांच्या यशाबद्दल सात्रळ महाविद्यालयानेही त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार योजनेअंतर्गत सन २०२० चे राज्य पुरस्कार शासनाकडून जाहीर करण्यात आले आहेत. शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सन २०२० च्या राज्य वाड्.मय पुरस्कारांमध्ये प्रौढ विभागातील उपेक्षितांचे साहित्य (  वंचित, शोषित, पीडित, आदिवासी, कष्टकरी, अनुसूचित जाती व नवबौद्ध इत्यादी) या वाड्.मय प्रकारासाठी दिला जाणारा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार डॉ. केदारे यांना जाहीर झालेला आहे. 

      प्रा. डॉ. अनंत केदारे हे सात्रळ  महाविद्यालयात हिंदी विषयाचे अध्यापन करत आहेत. डॉ. केदारे यांचे 'व्यवहारोपयोगी एवं कामकाजी हिंदी', 'संसद से सडक तक और गोलपिठा','तुलनात्मक अध्ययन', 'प्रसाद और तांबे का काव्य' इत्यादी ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

त्यांनी पुणे विद्यापीठाचे दोन व युजीसी, नवी दिल्लीचा एक लघु संशोधन प्रकल्प पूर्ण केले असून त्यांचे त्र्येच्याळीस संशोधनपर लेख विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकातून प्रसिद्ध आहेत. ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे एम. फिल., व पीएच. डी. चे संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. 

              या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंञी आ. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खा. डॉ. सुजय विखे पाटील,  संस्थेचे विश्वस्त अण्णासाहेब म्हस्के पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव  भारत घोगरे, सात्रळ महाविद्यालय विकास समितीचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. जयश्री सिनगर,  डाॅ. सोमनाथ घोलप, प्रा. दीपक घोलप, प्रा. दिनकर घाणे, डॉ. भाऊसाहेब नवले यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत