राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड मार्गावर श्रीरामपूर नाका परिसरात रस्ता ओलांडत असताना सायकल स्वराचा जागीच मृत्यू झाल्...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमाड मार्गावर श्रीरामपूर नाका परिसरात रस्ता ओलांडत असताना सायकल स्वराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे.
कंटेनर HR 55 AG 5288 याने धडक दिल्याने सायकलस्वार राम वाघ(रा.प्रसादनगर, वय अंदाजे-४५) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघात समयी भाऊसाहेब पगारे, आदिनाथ कराळे व परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मदत कार्य केली.
फॅक्टरी येथील नाक्यावर वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा असून नेहमी अपघात होत असतात. या ठिकाणी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावि अशी मागणी होत आहे.
Rama bagh yana bhavpurn shradhanjali
उत्तर द्याहटवा