14 गावांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

14 गावांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी

राहुरी(वेबटीम) राहुरी मतदार संघातील  14  गावांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधीच्या खर्चास मार्च 20...

राहुरी(वेबटीम)



राहुरी मतदार संघातील  14  गावांमध्ये तलाठी कार्यालय बांधकाम करण्यासाठी सुमारे 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधीच्या खर्चास मार्च 2022 च्या अर्थसंकल्पात प्रशासकीय मान्यता मिळाली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे आदेशाने व मा.मंत्री आम.प्राजक्तदादा तनपुरे यांचे विशेष प्रयत्नातुन हा निधी मंजुर झाला होता. राहुरी मतदार संघातील तलाठी कार्यालय अद्यावत होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. सध्या ठीक ठिकाणी असणारी कार्यालय अडचणीची व अडगळीची होती आता निविदा प्रक्रिया सुरु झाल्य़ाने कार्यालय उभारणीचा कार्यक्रम लवकरच हाती घेतला जाणार आहे. 


तालुक्यातील  खडांबे बुद्रुक डिग्रस, धामोरी बुद्रुक, कात्रड ,सोनगाव ,निंभेरे,तांभेरे ,कानडगाव , आरडगाव,  उंबरे, कोंढवड, केंदळ बुद्रुक ,मानोरी ,पिंप्री वळण ,या गावांचा समावेश आहे प्रत्येकी एक तलाठी कार्यालय उभारणीसाठी सुमारे 25 लाख रुपयांचा निधी मिळणार असून तलाठी कार्यालय सुसज्ज होणार आहेत. 


जागेची अडचणी व नैसर्गिक आपत्तीचा सामना तलाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना करावा लागत होता. सध्या कार्यरत असलेली तलाठी कार्यालयात पावसाळ्याच्या हंगामात पाणी  साचून महत्त्वाची दस्तावेज व कागदपत्रे धोक्यात येत असत गळके छप्पर उखडलेल्या फरश्या यासह अन्य समस्यांचा सामना करावा लागत होता. आता  निविदा प्रक्रिया सुरु झाल्याने कार्यालयांना येणारी संकटाची मालिका संपुष्टात येणार आहे. 

आमदार तनपुरे यांनी अधिक लक्ष घालत निधी उपलब्ध करून दिल्याने सर्व  14 गावातील विशेषता शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आमदार तनपुरे यांचे आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत