समाजाची नाळ जोडून ठेवत शेवटच्या श्वासापर्यंत स्व.शंकरराव कोल्हे यांनी काम केले- निवृत्ती महाराज इंदुरीकर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

समाजाची नाळ जोडून ठेवत शेवटच्या श्वासापर्यंत स्व.शंकरराव कोल्हे यांनी काम केले- निवृत्ती महाराज इंदुरीकर

कोपरगाव(प्रतिनिधी) माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत काम केले. त्यांचे प्रारब्ध चांगले होते.त्यांनी निष्ठावंत क...

कोपरगाव(प्रतिनिधी)



माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत काम केले. त्यांचे प्रारब्ध चांगले होते.त्यांनी निष्ठावंत कार्यकर्ते तयार करत त्यांना आपलेसे केले. संजीवनी उद्योग समूह आत्ताचा कोल्हे कारखाना व एज्युकेशन संस्था स्थापन करून शेतकरी व सर्वसामान्य माणसाला न्याय दिला. समाजाची नाळ त्यांनी ओळखली होती.जी माणसं स्वतःसाठी जगतात ती माणसं जगून मेल्यासारखे असतात मात्र जी माणसं दुसऱ्यासाठी जगतात ती माणसं कधी मरत नसतात स्व शंकरराव कोल्हे  दुसऱ्यासाठी जगले त्यांनी समाजाची नाळ जोडून ठेवत शेवटच्या श्वासापर्यंत काम केले असल्याचे प्रतिपादन समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी केले.




ते कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे साई आधार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्व शंकराव कोल्हे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकताना बोलत होते.यावेळी साई आधार प्रतिष्ठानचे संस्थापक माजी सरपंच केशवराव होन, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरुण येवले, संचालक मनीष गाडे, बाळासाहेब पानगव्हाणे, उपसरपंच विजय होन, पुंजासाहेब जावळे ,शिवाजी जावळे, डॉ.गोरक्षनाथ रोकडे, सुभेदार शांतीलाल होन, रामदास शिंदे, सरपंच संजय गुरसळ, दिलीप शिंदे, श्री शेख, अप्पासाहेब जावळे, प्रशांत होन, अनिल मुसमाडे,कल्याण होन, हरिभाऊ शिंदे, बाबा दहे अदी सह चांदेकसारे, सोनेवाडी ,घारी, डाऊच बुद्रुक, डाऊन खुर्द, जेऊर कुभारी,पोहेगांव पंचक्रोशीतील भजनी मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


जीवनात दुःख असल्याने फरक पडत नाही मात्र आपण छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात राहतो याचे भान ठेवा स्वाभिमान विकू नका. कोरोना पेक्षा कॅन्सरच्या आजाराचे प्रमाण जास्त आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबासाठी स्वतःच भाजीपाला पिकवा.जीवनाच्या शेवटपर्यंत आपले शरीर सांभाळा इंद्रीयांनी साथ सोडली तर आपला शेवट अटळ आहे. स्व. शंकराव कोल्हे हे समाजासाठी जगले त्यामुळे ते मोठे झाले.आपल्या वागण्याने व कर्तुत्वाने त्यांनी अनेक कार्यकर्त्यांची मनी जिंकली असल्याचेही इंदुरीकर महाराजांनी सांगितले.साई आधार प्रतिष्ठानच्या वतीने निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा सन्मान संस्थापक केशवराव होन व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.हजारो भाविक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जावळे यांनी केले तर आभार केशवराव होन यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत