राहूरी फॅक्टरी/वेबटीम:- पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर नाका येथे उद्या सोमव...
राहूरी फॅक्टरी/वेबटीम:-
पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या तडकाफडकी बदलीच्या निषेधार्थ राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूर नाका येथे उद्या सोमवार दिनांक २६ डिसेंबर रोजी सकाळी १० वा. सर्वपक्ष, संघटना, श्रीशिवाजीनगर व्यापारी असोसिएशन यांच्यावतीने निषेध सभा आयोजित केली आहे.
राहुरी फॅक्टरी परिसरातील वाढलेली गुन्हेगारी आळा घालण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे यशस्वी ठरल्याने व्यापारी वर्ग व सर्वसामान्यात भयमुक्तचे वातावरण पसरले होते मात्र दराडे यांची तडकाफडकी बदली झाल्याने सर्व स्तरांतून निषेध व्यक्त होत आहे.
उद्या सोमवारी सकाळी राहुरी फॅक्टरी परीसरात श्रीरामपूर नाका येथे उद्या सकाळी १० वा. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट),आरपीआय, वंचित बहुजन आघाडी,एकलव्य संघटना, शांती चौक मित्र मंडळ, श्रीशिवाजीनगर व्यापारी असोसिएशन व इतर सामाजिक संघटना यांच्यावतीने निषेध सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी या निषेध सभेत सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत