देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील खंडोबा मंदिराजवळ एका घरात अवैधरित्या प्लॅस्टिक गोण्यामध्ये विना परवाना ता...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील खंडोबा मंदिराजवळ एका घरात अवैधरित्या प्लॅस्टिक गोण्यामध्ये विना परवाना तांदूळ खरेदी विक्री करणाऱ्या एकाविरुद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल पथकाने हा छापा टाकला असून या ठिकाणी पथकाला १ लाख २० हजार रुपये किंमतीचा तांदूळ व ५५२५ रुपये किंमतीचा शासकीय बारदाना मिळून आला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
देवळाली प्रवरा येथील आनंद लखीचंद देसरडा हा शहरातील खंडोबा मंदीराजवळ राजळे वस्ती येथे अवैधरित्या प्लॅस्टिकच्या गोण्यामधील तांदूळ विनापरवाना खरेदी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना मिळून आला. तसेच त्याच्या कडे शासकीय खाकी बारदना(पोते) ही महसूल पथकाला मिळून आले.
राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार सुनील औटी, महेश देशमुख, तलाठी दीपक साळवे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या छाप्यात १ लाख २० हजार रुपये किंमतीच्या १६६ तांदूळ गोण्या तसेच ५ हजार ५२५ रुपयाचा ३२५ शासकीय गोण्या असा एकूण १ लाख २५ हजार ५२५ रुपयाचा मुद्देमाल मिळून आला
याबाबत राहुरीचे पुरवठा निरीक्षक ज्योती सगभोर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिस ठाण्यात आनंद लखीचंद देसरडा याच्याविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा करीत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत