राहुरी(वेबटीम) नगर व पाथर्डी तालुक्यातील काही गावांमध्ये जे आपल्या मतदार संघात येतात अशा गावातील निवडणुका यापूर्वी मुद्द्यावरून गुद्द्यावर य...
राहुरी(वेबटीम)
नगर व पाथर्डी तालुक्यातील काही गावांमध्ये जे आपल्या मतदार संघात येतात अशा गावातील निवडणुका यापूर्वी मुद्द्यावरून गुद्द्यावर येत होत्या त्यागावातील गावातील मतदारांनी अश्याना बाजूला सारून योग्य ते उमेदवार निवडून दिले. त्या विजयी झालेल्या सरपंच व सदस्यांना गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासन आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांनी दिले.
वांबोरी येथील प्रसाद शुगर येथे राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच व सदस्यांच्या सत्कार प्रसंगी श्री तनपुरे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, प्रसाद शुगरचे संचालक सुरेश बाफना, माजी सरपंच किसनराव जवरे, नितीन बाफना, प्रशांत नवले, तिसगावचे इलियास शेख,पंचायत समिती सदस्य बाळासाहेब लटके,पोखर्डीचे सरपंच रामेश्वर निमसे अडव्होकेट. अभिषेक भगत ,प्रतीक घोरपडे, विजय पालवे ,बाळासाहेब पालवे ,मारुती हारदे ,राजेंद्र आढाव, शिवाजी आढाव ,नवनाथ थोरात, डॉ. आढाव, अनिल रांधवणे आदी उपस्थित होते.
राहुरी तालुक्यातील मानोरी ,तुळापूर, ताहाराबाद, खडांबे खुर्द, केंदळ खुर्द, ब्राम्हणगाव भांड, कोल्हार खुर्द तसेच पाथर्डी तालुक्यातील बैजू बाभुळगाव ,कोल्हार, तिसगाव व नगर तालुक्यातील शेंडी, पांगरमल येथील नवनिर्वाचित सदस्य ,सरपंच उपस्थित होते.
यावेळी आमदार तनपुरे म्हणाले की, राहुरी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सरपंच व सदस्यांनी काम करताना विश्वस्त म्हणून निवडून दिले असून त्यांनी गावाच्या विकाससाठी एकत्र येऊन काम करावे त्यांना जी जी मदत लागेल ती करण्याचा माझा प्रयत्न असेल.
पाथर्डी व नगर तालुक्यातील आपल्या मतदार संघातील ज्या गावात आपल्या विचाराच्या कार्यकर्त्यांना मतदारांनी कोणत्याही दहशतीस न घाबरता मतदान करून सत्ता ताब्यात दिली त्या सर्वांचे आभार मानून या पूर्वी ह्या भागातील वैजू बाभुळगाव, पांगरमल,कोल्हार येथील निवडणुका ह्या मुद्द्यावर न होता गुद्द्यावर दहशती खाली होत होत्या स्व. मोहनराव पालवे ह्यांनी केलेली मदत मी कधीच विसरू शकणार नाही. त्यांचे मार्गदर्शनाखाली निवडून आलेल्यांना गावाच्या विकास करण्याची जबाबदारी नवीन सरपंच व सदस्यावर दिली असून आता निधीची जबाबदारी माझी आहे गावाच्या विकासासाठी निधी देऊन कामे केली जातील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. पाथर्डी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अतिशय जागरूक असलेल्या तिसगाव च्या निवडणुकीत माझी मोठी पंचायत झाली दोन्ही गटातील लोक माझे बरोबर होती त्यात काशिनाथ पाटील लवांडे अनिल रांधवणे विधानसभेला या गावातील सर्वच जण माझे बरोबर होते. त्या सर्वानी माझ्या विजयासाठी भरपूर कष्ट घेतले होते. पण मध्यंतरी झालेल्या काही घटनामुळे त्यामुळे माझी मोठी अडचण झाली.
ह्या गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे काम मी माझ्या परीने मार्गी लावले असून त्यासाठी मला खूप प्रयत्न करावे लागले असून तिसगावकरासाठी १५५ कोटी रुपयांच्या जलजीवन योजनेतून स्वतंत्र पाईप लाईन द्वारे पाण्याची योजना मंजूर केली असून ती पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे.असे आमदार तनपुरे यांनी शब्द दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत