राहुरी (वेबटीम) राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख ह्यांची उच्च न्यायालयाने जामीनावर सुटका केल्याचा आनंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक...
राहुरी (वेबटीम)
राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख ह्यांची उच्च न्यायालयाने जामीनावर सुटका केल्याचा आनंद राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना झाल्याने आज राहुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जल्लोष करण्यात येऊन फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
आज सायंकाळी 6 वाजता राहुरी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राहुरी नगर पालिकेच्या कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन माजी गृह मंत्री अनिल देशमुख ह्यांची जामीनावर सुटका करण्यात आल्याचा आनंद व्यक्त केला.
माजी नगरसेवक प्रकाश भुजाडी म्हणाले की भगवान के घरमे देर है लेकिन अंधेर नहीं है.गेली चार दशके राजकीय सामाजिक कार्यात काम करण्या एका निष्कलंक नेत्याला एका खोट्या फिर्यादीवरून अटक करण्यात आली होती. त्यांचेवर जो गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण कोणताही आरोप सिद्ध न झाल्याने उच्च न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे म्हणून आज आम्ही जल्लोष साजरा करत आहे.
माजी नगरसेवक नंदकुमार तनपुरे म्हणाले की, राज्याच्या माजी गृह मंत्र्याला कोणताही गुन्हा केलेला नसताना राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे उद्देशाने खोटे गुन्हे दाखल करून तब्बल 13 महिने अटकेत ठेवले होते. न्यायालयात अनिल देशमुख ह्यांचे विरुद्ध कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्यांचे जामीनावर सुटका केली असून आम्ही शहर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे ह्यांचे मार्गदर्शनाखाली आज जल्लोष साजरा केला आहे.
यावेळी महेश उदावंत, संकेत दुधाडे, रवींद्र तनपुरे, प्रवीण कदम शुभम धाडगे,नरेंद्र शिंदे गणेश धाडगे,सुनील सुराणा गणेश वराळे मज्जूभाई पिंजारी,किशोर पातोरे,अमोल रणसिंग शरद तनपुरे जीवन गुलदगड, शुभम थोरात, अमोल गुलदगड आदि उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत