सोनेवाडी(वेबटीम) संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या स्मरणार्थ उद्या शनिवार दिनांक 24 डिसेंबर रोज...
सोनेवाडी(वेबटीम)
संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकररावजी कोल्हे यांच्या स्मरणार्थ उद्या शनिवार दिनांक 24 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे जय हरी किर्तन होणार असल्याची चांदेकसारेचे माजी सरपंच केशवराव होन यांनी दिली.
साई आधार प्रतिष्ठानच्या वतीने केशवराव होन व धीरज बोरावके यांनी दिलेलं निमंत्रण स्वीकारलं असल्याचे इंदुरीकर महाराजांनी सांगितले.
न्यू इंग्लिश स्कूल मैदान ,समृद्धी महामार्गाच्या जवळ हा कार्यक्रम होणार आहे. जवळपास पाच हजार भाविक या कीर्तनाचा लाभ घेणार असल्याचे उद्दिष्ट ठेवून या मैदानाची साफसफाई करून तयारी करण्यात आली आहे.साई आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय होन ,संचालक प्रशांत होन मुकुंद होन व संचालक मंडळ हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेत आहे. संजीवनी उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपिन कोल्हे, माजी आमदार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून चांदेकसारे पंचक्रोशीतील भाविकांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा तसेच चांदेकसारे पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी उपस्थित राहुन कीर्तनास साथ संगत करावी असे आवाहन माजी सरपंच केशवराव होन, उपसरपंच विजय होन, प्रशांत होन व मुकुंद होन यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत