देवळाली प्रवरात उद्या सोमवारपासून साईनामाचा गजर - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरात उद्या सोमवारपासून साईनामाचा गजर

  देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील श्री साई प्रतिष्ठाण आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन दिना...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)

देवळाली प्रवरा येथील श्री साई प्रतिष्ठाण आयोजित श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन दिनांक २ जानेवारी ते ९ जानेवारी २०२३ दरम्यान करण्यात आले


 गेल्या ९ वर्षापासून श्री साई प्रतिष्ठान व देवळाली प्रवरा शहरवासिय यांच्या वतीने साई  सच्चरित्र पारायण याचे आयोजन करण्यात येते.या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते .यावर्षी पारायण याबरोबरच किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे या महोत्सवाचा प्रारंभ  २ जानेवारी २०२३ रोजी होणार असून सांगता ९ जानेवारी २०२३ रोजी होणार आहे . या निमित्ताने ध्वज पूजन  २ जानेवारी रोजी सकाळी ठीक ७ वाजता संपन्न होणार आहे.



सोमवार २ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता कलश पूजन व ग्रंथ पूजन होईल. त्यानंतर पारायण वाचनास सुरुवात होणार आहे. या या उत्सवानिमित्त  सकाळी ४.३० वा, काकड आरती, सकाळी ८ ते १२ साई सच्चरित्र पारायण ,माध्यन्ह आरती ,सायंकाळी  ४ वाजता हरिपाठ  , सायंकाळी - ६ वाजता धूप आरती, रात्री  ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कीर्तन त्यानंतर शेजआरती व नंतर महाप्रसाद वाटप केला जाणार आहे.


यंदाच्या उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.


 ०२ जानेवारी रोजी ह.भ.प बाबा महाराज मोरे (देवळाली प्रवरा)यांची कीर्तन सेवा होईल.०३ जानेवारी रोजी ह.भ.प अनिल महाराज पाटील(बार्शी)यांची कीर्तन सेवा होईल.४ जानेवारी रोजी ह.भ.प विशाल महाराज खोले(श्री क्षेत्र मेहुल,जळगाव) यांची कीर्तन सेवा होईल.५ जानेवारी रोजी ह.भ.प पुरुषोत्तम महाराज पाटील(बुलढाणा) यांची कीर्तन सेवा होईल.६ जानेवारी रोजी  ह.भ.प रामायणाचार्य संजय महाराज पाचपोर(विदर्भ अकोला) यांची कीर्तन सेवा होईल.७ जानेवारी रोजी ह.भ.प चंद्रकांत महाराज वांजळे(पुणे) व ८ जानेवारी रोजी ह.भ.प अँड. शंकर महाराज शेवाळे(आंबेगाव, पुणे)यांची कीर्तन सेवा होईल.


 ८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता ग्रंथ मिरवणूक व ६ वाजता दीपप्रज्वलन कार्यक्रम होईल.९ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ ह.भ.प महंत उद्धव महाराज मंडलिक(श्री. क्षेत्र नेवासा) यांचे भव्य काल्याचे कीर्तन होईल.व त्यानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन श्री साई प्रतिष्ठान व देवळाली प्रवरा शहरवासीय यांचे वतीने करण्यात आले आहे.


तरी या पारायण सोहळ्यास व कीर्तन महोत्सवास आपण सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. असे आवाहन श्री साई प्रतिष्ठान व देवळाली प्रवरा शहरवासियांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत