राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- दारू, अंमली पदार्थ सेवन करणे ही जशी माणसांना लागलेली व्यसने आहेत, त्याही पेक्षा अहंकारपणा, गर्विष्ठपणा, अपशब्द वापरण...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
दारू, अंमली पदार्थ सेवन करणे ही जशी माणसांना लागलेली व्यसने आहेत, त्याही पेक्षा अहंकारपणा, गर्विष्ठपणा, अपशब्द वापरणे ही भयंकर व्यसने आहेत. ही व्यसने थांबवली तर माणसातील माणुसकी जागृत होऊन कुटुंब व्यवस्था निश्चीतच टिकून राहील असे प्रतिपादन फादर भाऊसाहेब संसारे, रेक्टर पेपल सेमिनरी पूणे यांनी केले.
देवळाली प्रवरा येथील आंबीस्टोअर येथे नाताळ सणानिमित्त आयोजित पवित्र मिस्साबलित मुख्य पुरोहित म्हणून फादर संसारे बोलत होते.
या निमित्त श्रीरामपूर कॅथलिक धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरु फादर ज्यो. गायकवाड यांनी सांगितल, कि ज्या ज्या वेळेस पृथ्वीवर अराजकता निर्माण होते, माणसा माणसात कलह निर्माण होतो त्या त्या वेळेस पृथ्वीवर देवदेवतांचे अवतार जन्मास आलेले आहेत. प्रभु येशुने त्या करिता २०२२ वर्षापूर्वी मानवी रूपात जन्म घेतलेला आहे. प्रभु येशुचा जन्म मानवाला नम्रता, प्रेम, दया शांतीचा मार्ग दाखवत असतो.
या वेळी माजी आ.चंद्रशेखर कदम म्हणाले की, देवळाली यशहरात ने विविध धर्माचे सण, उत्सव, यात्रा, अतिशय ऐक्याने व शांततेने साजरे केले जातात.हीच परंपरा पुढे चालू राहुन ऐक्य ,समता, बंधुता यापुढेही अबाधित राहावी. फादर भाऊसाहेब संसारे यांच्या धर्मगुरू पदाच्या दिक्षेस १८ वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याच्या निमित्ताने फादर भाऊसाहेब संसारे यांना शुभेच्छा देऊन 'घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिल्लापाशी' या काव्यपंक्तीने फादर भाऊसाहेब यांना असलेल्या देवळाली गावाच्या ओढीचे वर्णन केले. दोन्ही हात मशीनमध्ये गमावलेल्या देवळालीतील बारा वर्षाच्या मुलीला फादरांनी केलेल्या मदतीचा उल्लेख करून सामाजिक दायित्वाचे कौतुक केले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या संदीप संसारे यांचा सन्मान संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवळाली प्रवराचे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले
यावेळी देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे, फादर सॅन्टो, फादर फिलीप, फादर फ्रॅन्सीस, फादर आनंद बोधक, फादर विलास सोनवणे तसेच वांबोरी व राहुरी फॅक्टरी येथील तसेच सेंट लुक हॉस्पिटल व कनोसाच्या सिस्टर्स, देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष गोरख मुसमाडे, मच्छिंद्र कदम ,शेतमजूर युनियनचे कॉम्रेड बाळासाहेब सुरडे , आजी-माजी नगरसेवक, सरपंच, सोसायटीचे चेअरमन विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती परिषदेच्या वतीने श्रीमती सगुनाबाई मार्शल संसारे यांना मानपत्र देऊन आदर्श माता म्हणून गौरविण्यात आले. परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भोसले, तालुका अध्यक्ष दीपक कदम, श्री.ब्राह्मणे ,पंडित सर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अशोक संसारे, अॅड. शशिकांत संसारे, प्राध्यापक विजय संसारे, कॉ. शरद संसारे, रावसाहेब संसारे, सतीश संसारे, विशाल संसारे सुशांत मुसमाडे, अक्षय संसारे, विश्वास संसारे, कल्पेश भालसिंग यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत