उंबरे नगरीत नववर्षाचे हरिनाम सप्ताहाने स्वागत ! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

उंबरे नगरीत नववर्षाचे हरिनाम सप्ताहाने स्वागत !

 उंबरे : वेबटीम   उंबरे येथे  वै हभप रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त  रविवार दि. 1 जानेवारी  ते 7 जानेवारी या कालावध...

 उंबरे : वेबटीम 


 उंबरे येथे  वै हभप रघुनाथ महाराज उंबरेकर यांच्या 39 व्या पुण्यतिथीनिमित्त  रविवार दि. 1 जानेवारी  ते 7 जानेवारी या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले आहे.                   

   नवीन वर्षाची सुरुवात उंबरे गावात हरिनाम सोहळ्याने होणार आहे.   
या कालावधीत माऊली महाराज बारवेकर, कृष्णा महाराज जिरेकर, बाळासाहेब महाराज डेंगळे, मच्छीन्द्र महाराज ढोकणे, चांगदेव महाराज शेडलकर, आदिनाथ महाराज दुशिंग, एकनाथ महाराज ढोकणे, वदंनाताई आंधळे, आणा महाराज राजदेव, गोरक्षनाथ महाराज ढोकने यांचे प्रवचन होणार आहे.  किसन महाराज पाठक, डेंगळे महाराज यांच्या सुमधुर वाणीतून पारायण होईल, दररोज काकडा, पारायण, दुपारी भजन होईल.  सप्ताहात  रात्री 8 ते 10 या कालावधीत नामांकित महारांजांची कीर्तने होणार आहेत. रविवारी दयानंद महाराज स्वामी कर्जत, सोमवारी श्रीनिवास महाराज घुगे, मंगळवारी महंत उद्धव महाराज मंडलिक, बुधवारी नित्यानंद गिरी महाराज, पिंपळवाडी,  गुरुवारी पांडुरंग महाराज गिरी, वावीकर, शुक्रवारी ज्ञानेश्वर माऊली कदम, आळंदी, शनिवारी कैलासगिरी महाराज, सावखेड यांचे कीर्तन होणार आहे.  रविवार दि 8 जानेवारी रोजी भागवत महाराज उंबरेकर यांचे सकाळी 9 ते 11 काल्याचे कीर्तन होईल, त्यानंतर महाप्रसादाने सांगता होईल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत